| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 7th, 2021

  रेनबो लॉज मध्ये देहव्यापार करणा-या आरोपी कन्हान पोलीसांनी पकडले

  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवाराती ल एन एच ४४ महामार्गा वरील स्पाट ऑन रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये पिडीत महिलेस पैश्याचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपीस पकडुन १३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

  बुधवार (दि.५) मे ला १५.४० ते १७.०५ वाजता दरम्यान आरोपी मंगेश मारोती बोरघरे वय २७ वर्ष रा. टेकाडी, ता. पारशिवनी हा नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील टेकाडी शिवारातील स्पाट ऑन रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये पिडीत महिलेस पैश्याचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करू न लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये रूम न १०३ उपलब्ध करून ग्राहकाकडुन पैसे घेऊन पिडीतेला आर्थिक प्रलोभन देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याचे मिळुन आल्याने फिर्यादी पोस्टे पोशि विशाल शंभरकर यांचे लेखी रिपोटवरून अप क्र १२४/ २१ कलम ४, ५ अनैतिक अत्याचार प्रति. अधि. अन्वये गुन्हा नोंद करून ५०० रूपयाच्या ६ नोटा तीन हजार रू. ओपो कम्पनीचा दोन सिम सह मोबाईल किमत दहा हजार रू. हॉटेल मधिल यात्री खतावणी रजिस्टर, मिथुन कम्पनीचे कंडोम असा एकुण १३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस सुचना पत्रावर सोडुन तपासात घेतला आहे.

  नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्ष क मा राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माखणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी मुखत्तार बागवाण यांच्या मार्गदर्शनात परी.पो.उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, सपोनि सतिश मेश्राम, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, मंगेश सोनटक्के, चालक नापोशि संदीप गेडाम, मपोशि आदीने शिताफितीने धाड मारून कारवाई करून आरोपीस पकडले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145