पाराशिवनी :-तालुक्यातील कांद्री ग्राम पंचायत हहीत तिल येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोविड सेंटर तयार केले.
अधिकारी यांच्या बेजाबाबदार पणामुळे व जवाहरलाल नेहरू चिकीत्सालय कांद्री येथील उपस्थित वैध्यकीय अधिकारी यांनी कर्तव्यात हयगय केल्यामुळे चारही रूग्णांचा मृत्यु झाला यासर्व प्रकरणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणेदार यांना मृताचा कुंटूबानी निवेदन दिले.
कन्हान पोलीस स्टेशन परीसरातील जवाहरलाल नेहरू चिकीत्सालय कांद्री
येथे प्रशासनाचा बेजबाबदार पणामुळे मंगलवारी दिनांक १३/०४/२०२१ ला कोव्हीड पॉसिटीव्ह रुग्णांचा मृत्यूस जबाबदार
(१)योगेश कुंभेजकर. मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर.
(२)डॉ दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर,
(३)जिल्हाशल्यचिकित्सक ,इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय नागपूर .
(४)डॉ विजया माने, वैद्यकीय अधिकारी डब्लूसीएल कांद्री यांचा विरूदध मृताचा कुंटूबातील (१)अनिरुद्ध नत्थूजी बोराडे , रा. टेकाडी वय-४५ वर्ष ,
(२)अनिल संतोषराव कडू . रा. टेकाडी वय-५० वर्ष ,
(३)सागर दीनदयाल भारद्वाज रा. पटेल नगर कन्हान , वय-२८ वर्ष यांनी निवेदनातून आरोप करीत गैरअर्जदार प्रशासनिक अधिकारी यांनी मा.जिल्हाधिकारी नागपूर यांची दिशाभूल करून जवाहरलाल नेहरू चिकीत्सालय कांद्री येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा चुकीचा प्रस्ताव सादर करून जिल्हाधिकारी यांचेकडून क्र. जिनिक /क.लि/नै. आ व्या /कावि . १७२/२०२१ दिनांक २७/०३/२०२१ अन्वये अपत्य व्यवस्थापन कायदा -२००५ कलम ६५ अंतर्गत प्रस्ताव मान्य करून घेतले .
४८ बेडचे हे कोव्हीड केअर सेंटर चालविण्याकरिता लागणारे अत्यावश्यक सुविधा नियमानुसार तिथे उपलब्ध नव्हते . आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका , सहाय्यक व ४८ बेडच्या रुग्णांकरिता लागणारी आवश्यक ऑक्सिजनची व्यवस्था तिथे नसतांना कोव्हीड केअर सेंटर कश्या प्रकारे सुरु करण्यात आले? तिथे फक्त एक वैद्यकीय अधिकारी आले होते दिनांक-१०/०४/२०२१ पासून
सकाळी ८.30 ते ३.३० पर्यंत रुग्णांची तपासणी करून निघून जात होते उर्वरित वेळेत रुग्णांची काळजी
घेण्याकरीता कोणतेही वैद्यकीय अधिकारी कींवा इतर अधिकृत वैद्यकीय विभागाशी संबंधीत अधिकारी नव्हते .मग जिल्हा परिषद प्रशासनाने अपूर्ण व्यवस्था असताना कोव्हीड केअर सेटर का सुरू केला ? असा सवाल मृताचा कुंटूबानी
यांच्या बेजबाबदार पणामुळे मृतक १) अमित दिनदयाल भारद्वाज वय-३१,
(२)किरण राधेश्याम बोराडे वय-४७ रा. टेकाडी,
(३)कल्पना अनिल कडू वय -३८ रा. टेकाडी व
(४)हुकूमचंद येरपुडे वय-५७ रा कन्हान या चारही रुग्णांना जवाहरलाल नेहरू चिकीत्सालय कांद्री येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते परंतु प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने व वरील अधिकारी यांनी आवश्यक वैद्यकीय अधिकारी व इतर सुविधांची उपलब्धता न करून दिल्यामुळे सदर रुग्णालयात मंगलवारी दिनांक १३/०४/२०२१ ला सकाळी ६ वाजता रुग्णांकरिता आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे चार रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला व सौ. नमिता मानकर या चार महिन्याच्या गर्भवती पाचव्या रुग्णाला परिस्थितीचे गांभीर्य पाहून इतरत्र उपचाराकरिता नेत असतांना रस्त्यात मृत्यू झाला.यासर्व प्रकरणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणेदार सुजीतकुमार श्रीरसागर प्रभारी उपविभागीय पोलिस अधीकारी यांना मृताचा कुंटूबानी निवेदनातून कारवाई करण्याची मागणी केली .