Published On : Tue, Nov 12th, 2019

कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सव थाटात संपन्न

दि. ८ ते १० नोव्हेंबर तीन दिवसी य विविध कार्यक्रमाची रेलचेल.

कन्हान : – रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिर, बाल किर्तन कार तुलशी हिवरे हिचे समाज प्रबोधन, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक सचिव इंजि. तुषार उमाळे व प्रा प्रदीप आगलावे यांचे मार्मिक समाज प्रबोधनासह ट्रँक शो ऑरकेष्ट्रा, रेकॉर्डिंग डॉन्स, लावणी, भिम व हिंदी गितांच्या कार्यक्रमाने तीन दिवसीय कन्हान सांस्कृतिक महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ११.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिराचे उद्घाटन कन्हान नगराध्यक्ष मा शंकर चहांदे यांच्या अध्यक्षेत पोलीस निरीक्षक कन्हान मा चंद्रकांत काळे यांच्या हस्ते व समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात प्रदेश प्रोजेक्ट अधिकारी बी ए आर सी आय राहुल गायकवाड, प्रोजेक्ट कॉडने टर बादल श्रीरामे, मार्गदर्शक कैलाश बोरकर, रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेशाध्य क्ष चंद्रशेखर भिमटे आदीच्या प्रमुख उपस्थित महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता प्रसिध्द ११ वर्षीय बाल संप्त खंजरी वादक कु तुळशी यशवंतराव हिवरे चा
परिवर्तनवादी समाज प्रबोधनाच्या कार्य क्रमाने रसिक श्रौत्यांची सांज बाधुन मंत्रमुग्ध केले.

शनिवार (दि.९) ला सका ळी ११ ते ४ वाजेपर्यंत समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनां ची माहिती शिबिर, सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाराष्ट्राची मराठमोळी मैदानी बुलंद तोफ, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक सचिव शिवश्री तुषार उमाळे, आंबेडकरी विचारवंत प्रा डॉ प्रदीप आगलावे, मंडपे सर हयानी ओबीसी /एस सी/एस टी /एन टी सर्व बहुजन समाजाची दशा व दिशा या विषयावर मार्मिक समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले. पंजाबच्या नागौर येथील शालेय राष्ट्रीय मैदानी दौड व लांब उडी स्पर्धेत तीन स्वर्ण व दोन रोप्य पदक पटकावुन कन्हानचे नाव लौकिक केल्याबद्दल बीकेसीपी शाळा कन्हान ची इयत्ता १० वी ची विद्यार्थींनी कु. सानिका अनिल मंगर हिंचा मान्यवरां च्या हस्ते संविधान व पुष्पगुच्छ देऊन गौरव सत्कार करण्यात आला.

(दि.१०) ला सकाळी ९ ते ४ वाजता समाज कल्याण विभागा तर्फे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिररासह सकाळी११ वाजता उपविभागीय पोली स अधिकारी मा संजय पुज्जलवार यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून भिम व हिंदी गितांचा युगल नजराना कार्यक्रमा ची सुरवात करण्यात आली. दुपारी ३ ते ४ वाजता रामटेक विधानसभा निवडणु कीत पराजित उमेदवार डी एम रेड्डी, रमेश कारेमोरे, संजय सत्येकार आदीचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता १२८ तास सतत गित गायनाचा गिनीज बुक वल्ड रेकॉर्ड करणारे सुरज शर्मा यांच्या ट्रँक शो ऑरकेष्ट्रा, रेकॉर्डिंग डॉन्स, लावणी, भिम गित, मराठी हिंदी गितांच्या कार्यक्रमाने श्रौते मंत्रमुग्ध होऊ न कार्यक्रमाचा मनसोक्त आंनद लुटला.

याच दरम्यान पत्रकार, मान्यवरांचा सुध्दा सत्कार सोहळ्यासह ३ दिवसीय सांस्कृ तिक महोत्सवाची सांगता करण्यात आली. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे सुत्र संचालन मोतीराम रहाटे व नरेश चिमनकर हयानी तर आभार प्रदर्शन कैलास बोरकर व रमेश गोळघाटे हयानी केले. कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्स वाच्या यशस्वीते करिता आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान चे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर, मोतीराम रहाटे, रमेश गोळघाटे, रोहित मानवटकर, नरेश चिमनकर, शांताराम जळते, कमलसिंग यादव, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, उमेश बागडे, चेतन मेश्राम, नेवालाल सहारे, सुखलाल मडावी, बाळा मेश्राम, सोनु मसराम, अखिलेश मेश्राम, अजय चव्हाण, यार मोहम्मद कुरेशी, बादल सहारे आदीने मौलिक परिश्रम घेतले.