Published On : Wed, Dec 26th, 2018

कन्हान ला ख्रिसमस (नाताळ)उत्सहात संपन्न

कन्हान : – परिसरातील गिरजाघर (चर्च ) म़ध्ये प्रभु येशु मसिहा यांच्या जन्म दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ख्रिसमस (नाताळ)उत्सहात साजरा करण्यात आला .

विश्व ज्योती चर्च गणेश नगर कन्हान
विश्व शांती करिता त्यांचे बलिदान व त्यानी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करण्याकरिता प्रभु येशु मसिहा यांचा जन्मदिवस ख्रिसमस फॉदर सब्रास्टियन डिस्कोटा फर्नाडिस यांच्या मार्गदर्शनात गणेश नगर कन्हान येथील विश्व ज्योती चर्च सुंदर इंद्रधनुष्याच्या सात रंगाने सजविण्यात आला होता . रंगबिरंगी विघृत रोशनाई व प्रभु येशु यांची मुर्ती व जिवन प्रसंग विश्व शांती व बलीदानाचे संदेश स्पष्ट करित होते .

मुलांन करिता स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रंचितराव लॉरेन्स एंन्थोनी, नेल्सन जेम्स, फ्लोरा शाजी , शिरिल पॉल, मायकल राव, अरल जोसेफ, जुलीयाना राव, डिसेन मायकल, अरलनदास जेम्स, मधु फ्रॉन्सिस, लॉरेटा जेम्स, सुमन थॉमस, नेन्सी जेम्स, संजय जोसेफ सह ख्रिश्चन बांधवांनी सहकार्य करून ख्रिसमस (नाताळ) उत्साहात साजरा केला .

बेतल चर्च पिपरी रोड कन्हान
पॉस्टर प्रकाश दामले यांच्या मार्गदर्शनात बेतेल चर्च पिपरी रोड कन्हान येथे प्रभु येशु यांचा जन्मदिवस थाटात साजरा करण्यात आला . चर्च मध्ये प्रभु येशु यांच्या जिवनावरील सुंदर गीत गायन करण्यात आले . रात्री केक कापुन फटाक्यांची आतिषबाजी करून उत्साहात जन्मदिवस साजरा करण्यात आला .

उपस्थितीत मंडळीना जेवन देऊन थाटात ख्रिसमस (नाताळ) साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जॉन दामले , सचिन नारनवरे , कुलदीप नाईक, संजय नायडु , राजु जोसेफ, आनंद नायडु , नितेश कुर्वे , जोयल दामले , रूपेश विश्वकर्मा , नितीन नारनवरे , चिंटु सहारे, सजना नायडु, श्वेता नारनवरे आदीने सहकार्य केले .