Published On : Sat, May 25th, 2019

कन्हान, कांद्री ला भाजपाच्या विजयाचा जल्लोष

Advertisement

कन्हान: भाजप ने न भुतो न भविष्यती असा विजयी आकडा ऊभा करून एक नवा रिकाँर्ड बनवुन जगा समोर आदर्श ऊभा केल्याचा आनंद कन्हान येथील भाजप पदाधीकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरीकांनी गुलाला ची ऊधळन करत आतिषबाजीत डीजेच्या तालात जल्लोष रँली काढली व आनंद साजरा केला. यात प्रामुख्याने नगराध्यक्ष शंकर चहांदे, भाजप तालुका अध्यक्ष जयराम मेहरकुळे, जिवन मुंगले, योगेश वाडीभस्मे, शहर अध्यक्ष विनोद किरपान, डाँ.मनोहर पाठक, मनोज कुरडकर, राजेंद्रे शेंदरे, लक्ष्मी लाडेकर, संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, मनिषा पारधी, नितु गजभिये, सुनिता ईखार, हेमलता जुनघरे, रेखा करंडे, स्वाती पाठक, सुनिल लाडेकर, शैलेश शेळके, रिंकेश चवरे, चिंटु वाकुडकर, मुलचंद शिंदेकर, ऋृषभ बावनकर, अमोल साकोरे, देवा तेलोते, अजय चव्हान, विजय पारधी, आशिष राठी, किरण ठाकुर, हर्ष पाटील, महेंद्र साबरे, सुनील आगुटलेवार , अमिष रूंघे, मयुर माटे, मुरलीधर नानोटे, अश्विन भिवगडे, दिनेश आणि शेकडो नागरीक उपस्थित होऊन आनंदोत्सव साजरा केला.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपा विजयाचा कान्द्री शहरात विजयी जल्लोष
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमित शाहजी, विकासपुरुष मा. नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ,ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळेजी, रामटेक चे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यात मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष कान्द्री शहरात विजयी मिरवणूक काढून भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर जिल्ह्याचे महामंत्री अतुल हजारे यांच्या नेतृत्वात प्रामुख्याने साजरा करण्यात आला. ही मिरवणूक कान्द्री शहराच्या संताजी नगर चौकातून सुरू करून कान्द्री शहरातील विविध परिसर भ्रमण करीत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. या विजयी जल्लोषात सहभागी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष जयराम मेहरकुळे, टेकाडी-कान्द्री जि.प. सर्कल प्रमुख व ग्राम पंचायत सदस्य शिवाजी चकोले, कान्द्री शहर अध्यक्ष महादेव किरपान, माजी सरपंचा सौ.ज्योतीताई शेंदरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.हर्षली नागपूरकर, ग्रामपंचायत सदस्यां- सौ.अरुणा हजारे, सौ.अरुणा पोहरकर, सौ.विभा पोटभरे, धर्मेंद्र गणवीर, राजेश पोटभरे, शरद किरपान, शेखर गिर्हे, सौरभ पोटभरे, संकेत चकोले, लोकेश अंबाडकर, नितेश कामळे, गणेश किरपान, रोहित चकोले, विनोद कोहळे, दिनेश खाडे, चंद्रकांत बावणे, किरण चकोले, आकाश कापसे, सतीश झळके, गणेश शर्मा, उमेश कुंभलकर, राजहंस वंजारी, प्रयाग पोटभरे, अमरदीप कापसे, कृनाल नागपूरकर, प्रियेश मलिक, मनोज कश्यप सह शेकडो भाजपा-शिवसेना विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना गुलाल लावत गुलाल उधळून डीजेच्या तालावर थिरकून महिला भगिनींनी, जेष्ठ वर्गानी व युवा पिढीने या ऐतिहासिक विजयचा आनंदोत्सव थाटात साजरा केला.

प्रतिक्रिया: संपुर्ण देशातुन भाजपचा एकहाती विजय म्हणजेच हा जनतेचा कौल आहे, जनतेचा विजय आहे. सर्वसामान्यांना भाजपकडून अपेक्षा आहेत व गेल्या ५ वर्षात त्यावर पक्ष खरा ऊतरला आहे. हे त्याचं प्रमाण आहे. तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाला जळामुळासकट ऊपटून काढल्याबद्दल संपूर्ण मतदारांचे अभिनंदन…पक्षश्रेष्ठींचे अभिनंदन…

शैलेष शेळके – तालुका प्रसिद्धि प्रमुख,
भाजपा पारशिवनी तालुका.

– मोतीराम रहाटे,कन्हान

Advertisement
Advertisement