Advertisement
कामठी :-वार्षिक हजारो कोटींची उलाढाल असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्य 12 संचालक जागेसाठी येत्या 29 फेब्रुवारी ला निवडणूक होऊ घातली असून या 12 जागेसाठी एकुण 42 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या चर्चे अंती ह्या 12 जागेसाठी कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीसाठी प्रत्येकी 5 जागा तर शिवसेनेला 2 जागा देण्याचे ठरविण्यात आले.
यानुसार महाविकास आघाडीतील उमेदवारात कांग्रेस कडून नागपूर विभागातील कांग्रेस चे ज्येष्ठ पदाधिकारी व कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हुकूमचंद आंमधरे हे सुद्धा रिंगणात आहेत तसेच नागपूर वि भागातून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून सुधीर कोठारी आहेत .
संदीप कांबळे कामठी