Published On : Mon, Oct 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठी-नागपूर मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Advertisement

कामठी : कामठी-नागपूर मार्गावरील साईबाबा कॉलनी परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मृताची ओळख अजय शेषराव वाडीवे (३०, रा. हमालपुरा, कामठी) अशी झाली आहे. अजय हे मूळचे पवनी, देवलापार, ता. रामटेक येथील रहिवासी असून सध्या कामानिमित्त कामठी येथे राहत होते. ते ट्रकचालक म्हणून काम करत होते.

नागपूर येथे ट्रक मालकाकडे ट्रक उभा केल्यानंतर अजय दुचाकीने कामठी येथील घरी परतत होते. दरम्यान, साईबाबा कॉलनी परिसरात मागून कामठीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अजय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.