Published On : Fri, Aug 23rd, 2019

कामठीच्या कर्जबाजारी तरुणाची नागपुरात गोळी झाळून आत्महत्या

कामठी :-माँ शारदा सार्वजनिक मंडळ कामठी च्या नावाने भिसी व्यवसाय सुरू करून लोकांच्या पैस्याची गुंतवणूक करून लोकांची साडे बारा लक्ष रुपयाची फसवणूक करणाऱ्या मोंढा कामठी रहिवासी एका विवाहित कर्जबाजारी तरुणाने नागपूर येथे राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत पिस्टल च्या गोळ्या स्वतःच्या डोक्याला मारून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 10 दरम्यान निदर्शनास आली असून आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आशिष धर्मराज उसरे वय 26 वर्षे रा मोंढा कामठी तर हल्ली मुक्काम जयवंत नगर आजनी नागपूर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक तरुनाणे मागील एक वर्षांपूर्वी मोंढा कामठी येथे माँ शारदा सार्वजनिक मंडळ कामठी नावाने भिसी व्यवसाय सुरू करून एजंट च्या माध्यमातून लोकांकडून आर्थिक गुंतवणूक करून घेतली व पैस्याची परतफेड करतेवेळी नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रणाळा रोड वर भरदिवसा चाकूच्या धाकावर लाखो रुपयांची लुबाडणूक झाली असल्याचा बनवाबनवी केल्याचा प्रकार करीत पोलिसांना वेठीस धरले होते मात्र नवीन कामठी पोलिसांनी या प्रकाराचा खरे उघडकीस आणून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची परतफेड करण्याची क्षमता नसल्याने हा बनवाबनवी केली असल्याचा प्रकार उघडकीस आणून पीडित फिर्यादी कृष्णा अवचित गोळे वय 51 वर्षे रा आजनी ता.कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून यातील मुख्य आरोपी आशिष उसरे , एजंट राजेश काटरपवार , मदार बांते व निशा हटवार या चारही आरोपीविरुद्ध भादवी कलम 420, 406, 34 अंनव्ये गुन्हा नोंदविन्याची कारवाही 2 मार्च 2019 ला केली होती.यातील महिला आरोपीला सोडून इतर तीन आरोपीना अटक करोत न्यायालयात हजर करोत कायदेशीर रित्या न्यायालयीन आदेशानव्ये जामीनावर सुद्धा सोडण्यात आले होते यानुसार मुख्य आरोपी आशिष उसरे ला मे महिन्यात जामीन मिळताच गुंतवणूक दार खातेधारक नागरिकानो पैस्याची मागणी करण्यासाठो एकच तगादा लावला होता याप्रकारे जवळपास साडे बारा लक्ष रुपयाचे कर्ज नागरिकाना देने बाकी होते

या नागरीकांच्या जाचक त्रासाला कंटाळून त्रस्त होऊन मृतक आशिष उसरे यांनी नागपूर येथील जयवंत नगर आजनी येथील निलेश शर्मा यांच्या घरी पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते मात्र नागरीकांच्या पैस्याच्या मागणीचे फोन नियमित सुरू असल्याने मृतकात पूर्णतः नैराश्येचे वातावरण पसरले होते .काल 23 मे ला मृतकाची पत्नी योगिनी उसरे हिचे मोठे बाबा दादाराव हलमारे यांचा मोंढा येथे दुःखद निधन झाल्याने अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी पत्नी एकटीच सकाळी 10 वाजता नागपूर हुन कामठी ला निघाली मात्र लोकांच्या भीतीने मृतक आशिष ला या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागो होता आले नाही परिणामी मृतक हा एकटाच घरी होता.

अंत्यसंस्कार कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्नी योगिनी ने आशिष उसरे ला जवळपास 30 वेळा मोबाईल वर कॉल केले मात्र प्रतिउत्तर न आल्याने पत्नी योगिणीने रात्री 10 वाजता नागपूर येथील घरी पोहोचताच दार ठोठावले मात्र दार आतून बंद असल्याने दार उघडत नव्हता व कुठलाही प्रतिसाद येत नव्हता यावेळी घरमालक निलेश शर्मा यांना मदतीसासाठो बोलावुन खिडकीच्या फटीतून बघितले असता मृतक आशिष हा रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडलेला दिसल्याने एकच धक्का बसला यावेळी त्वरित आजनी नागपूर पोलिसांना घटनेची माहितो देण्यात आली.

पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून दार तोडून घरात प्रवेश करून घटनास्थळाचा पंचनामा करोत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ शासकीय रुग्णालयात हलवून फिर्यादी पत्नी योगिनी आशिष उसरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

तर या संदर्भात घरी कुणी नसल्याचे संधी साधुन मृतक आशिष उसरे ने स्वतःच्या डोक्यात पिस्टल च्या गोळ्या मारून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली असली तरी यात शंका कुशंका करोत कुणी दुसऱ्याने पैसे बुडविल्याचा रागाचा वचपा काढण्यासाठी हत्या तर केली नसावी असा संशय व्यक्त करीत ही हत्या की आत्महत्या या चर्चेला उधाण आहे

संदीप कांबळे कामठी