Published On : Tue, May 28th, 2019

कामठी तालुक्यामध्ये पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस

तालुक्याच्या निकाल ८१.२० टक्के

कामठी: विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची पायरी समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१९ ला घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कामठी तालुक्याचा निकाल ८१.२० टक्के लागला असून तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे मुलापेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील फक्त एका महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला आहे.
कामठी तालुक्यामध्ये २३४९ मुले व १७१९ मुली असे एकूण ४०४८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी १८०२ मुले (७७.३७)व १४७९ मुली (८६.०४) असे एकूण ३२८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८१.२० आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा तालुक्याचा निकाल ८ टक्के कमी लागला आहे. तालुक्यातील भोसला मिलिटरी स्कूल पंचवटी कोराडी चा निकाल शतप्रतिशत लागला आहे. तालुक्यातील कामठी च्या एस.आर. लोहीया क.म.(९५.९१), एम.एम. रब्बानी (८०.९०), सेठ केसरीमल पोरवाल (७७.९७), नूतन सरस्वती गर्ल्स (८४.५०), नूतन सरस्वती बॉईज (८१.२५), इंदिरा हाय. व क.म.(२५), रामकृष्ण शारदा मिशन (९५.१२), मास्टर नूर मोहम्मद (२१.२७), कोराडी येथील विद्या मंदीर क.म. (८४.१०), तेजस्विनी क.म. (८३.१३), आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (८७.९०), प्रागतिक उच्च माध्यमिक विद्यालय (७४.०९), सरस्वती क.म. पांजरा (८३.१९), सौरभ चंभारे क.म. टेमसना (५७.१४), स्व. झेड बावीस्कर क.म. पावन गाव (६६.६६), तुळजा भवानी क.म. गुमथाळा (७०.४०), जयंत राव वंजारी क.म. वाडोदा (८६.२५), इंडियन ऑलिम्पियाड भिलगा व (९६.९६), गणपती क.म. वडो दा (८१.८१), प्रियांती क.म.(९०.४७) लागला आहे.

– संदीप कांबळे