Published On : Wed, Mar 11th, 2020

कामगार नोंदणीमध्ये भाजप सरकारचा कोट्यावधीचा घोटाळा

Advertisement

प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे आणि तापेश्वरजी वैद्य यांनी उचलला प्रश्न,कामगारांवर अन्याय आणि श्रीमंतांना मिळाला फायदा

कामठी :-महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवा शर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षा आरोग्य संबंधीत बाबी पुरविणे या उद्देशाने ‘इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई’ या मंडळाची स्थापना केली.

या मंडळाच्या वतीने बांधकाम करणार्‍या कामगारांच्या कल्याणास्तव विविध योजना राबविल्या जातात. परंतु 2017 पासून या मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या कामगार नोंदणी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे आढळून येते.

या कामगार कल्याणकारी योजनांमध्ये भाजप सरकारच्या काळात कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. *प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे यांनी उपरोक्त घोटाळ्याची चौकशी करून सदर दोषींविरुद्द त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

आज दि. 09 मार्च 2020 ला जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती तापेश्वरजी वैद्य व जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे* यांच्या नेतृत्वात मा. कामगार आयुक्त कार्यालय येथे मा. लोहिया साहेब सहा. कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, कामठी तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले, पंचायत समिती मौदाचे माजी सभापती राजुजी ठवकर, ग्रामपंचायत चिकना येथील सरपंच नंदकिशोर खेटमले, ग्रा.पं. केमचे उपसरपंच अतुल बाळबुधे, रमेश लेकुरवाळे, अनिकेत शहाणे, विजय खोडके, भारत आंबिलडुके, विलास मोहोड, प्रेम चांभारे व इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
– संदीप कांबळे