Published On : Wed, Mar 11th, 2020

महिलांनी धावपळीच्या जीवनात कर्तव्य पार पडत असताना आपला व आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे – बावनकुळे

Advertisement

कामठी – महिलांनी धावपळीच्या जीवनात कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असताना आपला व आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान कोराडी च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्ता ज्योती बावनकुळे यांनी खासाला ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

जागतिक महिला दिन कार्यक्रमाची सुरुवात ज्योती बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षा कांचन कुथे, रनाळा ग्रामपंचायच्या सरपंच सुवर्णा साबळे, येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे ,खासाला ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनीता वैरागडे ,छाया सावरकर, छबी रोकडे, अरुणा तभाने, मीना चौधरी अनुराधा अमीन, अवंतिका महाजन, सोनू डफरे, उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते खासाला येथील चंद्रकला रमेश नेवारे या महिलेनी हात मजुरीचे काम करून आपल्या चार मुली व एका मुलाला उत्तम शिक्षण देऊन योग्यरीत्या घडवण्याचे फार मोलाचे कार्य केले त्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ ,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी महिलांना मोखिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्रिती गाडेकर, शालिनी इंगळे, छबुताई बावनकुळे, सुनीता रोकडे, राजुष इंगोले, यशोधरा फुलझेले, अनुसया वैरागडे, यमुना बावनकुळे, सुनिता डाखोरे, ज्योती गभाने, पौर्णिमा पारधी, माला राऊत, पुजा सावरकर, पूनम बावनकुळे, भावना शंभरकर, लक्ष्मी कापसे, अरुना डाखोडे,संचली कानतोडे, सरोज डाखोडे, सुषमा सिलुटकर, यशोदा बावनकुळे, जयश्री इंगोले, दुर्गा पेठे, सोनू इंगोले, प्रियंका बावनकुळे, विशाखा कापसे, वंदना मोहोड़, प्रिति गाड़ेकर, प्रणाली सराड़, निलिमा गभने, रंजु भोयर, रानी चौधरी, पायल उके, हिना कुठेकर, योगिता चिमोटे, माया भोयर, वैष्णवी जीभकाटे, सुवर्णा बावनकुळे, सुनीता कापसे,सविता राऊत,नयना नेवारे,पुजा राऊत,माधुरी वैरागडे,कल्पना बावनकुळे,सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच सुनिता वैरागडे यांनी केले संचालन मंजुषा इंगोले यांनी केले व आभार प्रदर्शन कीर्ती इंगोले यांनी मानले.
– संदीप कांबळे

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement
Advertisement