Published On : Thu, Aug 8th, 2019

कामठीत दक्षिण कोरिया ची प्रसिद्ध थेरेपी केंद्रा चा शुभारंभ

Advertisement

कामठी : आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक जीवनात प्रत्येक माणूस हा धडपडत असून कर्तव्यदक्ष जवाबदारीत गुंतलेला आहे परिणामी कित्येकांनी निरोगी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने कमी वयातच म्हातारपण आल्याचे जाणवते त्यामुळे कर्तव्यदक्ष जवाबदारी पार पाडण्यासह स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे असल्याचे मौलिक प्रतिपादन नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांनी गांधी चौकात नव्यानेच सुरू झालेल्या दक्षिण कोरिया च्या प्रसिद्ध थेरेपी हेल्थ केअर सेंटर च्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

कामठीतील नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉ सरोज उके व डॉ प्रमोद उके यांच्या वतीने गांधी चौकात सरोज ब्युटी क्लिनिक च्या बाजूला फाऊंडेशन ग्लोरी ऑफ इंनफायनाईट ब्युटी क्लिनिक अँड हेल्थ केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला असून यामध्ये दक्षिण कोरिया ची प्रसिद्ध थेरेपी करण्यात येईल.

ही थेरेपी एक दिवसाच्या बाल्कपासून ते 100 वर्षे वयाच्या माणसाची सुद्धा करता येईल या थेरेपीत मसाज,थर्मल एफआयआर, बायोवेज, मोक्सीवूषल, ऑकुप्रेशर, एकुपंक्चर, कायरोप्रॅक्टिक, वायब्रेशन या आठ प्रकारच्या प्रक्रियेतून केलेली 40 मिनिटांची थेरेपी केल्यानंतर मानसाचा व्यायाम होत चेहऱ्यावर प्रफुल्लित पणा निर्माण होत निरोगी स्वास्थ्यास मदतशील ठरते.

या दक्षीण कोरिया थेरेपी केंद्राचे उदघाटन नगराध्यक्ष मो शाहजहा शफाआत यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आली.याप्रसंगी नगर परिषद कर्मचारी माधुरी घोडेस्वार, केंद्राचे डॉ सरोज उके, डॉ प्रमोद उके, सुरेश मेश्राम, रेखा मेश्राम, सुजाता मेश्राम, वर्षा ढोके, रंजना ढवळे, सिमरन शेख , कुमुद पाटील, पायल आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी