Published On : Fri, Sep 13th, 2019

कामठी तालुक्यात ड्रोन कॅमेराद्वारे गावठाण मोजणीचा शुभारंभ

पालकमंत्री ना.बावनकुळे च्या मूळ गाव खसाळा मधून मुळगावठान सर्वे अभियानाला सुरुवात

गावातील प्रत्येक घरमालकाला मिळणार आखीवपत्रिका

कामठी :,- राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठानची ड्रोन कॅमेराद्वारे मोजणी करण्याचा नोर्णय घेतला आहे .इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतींना आपली हद्द देखील माहीत नव्हती .शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतलयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ग्राम विकास विभाग, भुमीअभिलेख विभाग व सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्तविद्यमाने ड्रोन द्वारे गावठान सर्वे अभियानाला सम्पुर्ण महाराष्ट्रातील चाळीस हजार गावासाठी करण्यात येत असून विदर्भात नागपूर जिल्ह्याअंतर्गत पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मूळ गाव असलेल्या कामठी तालुक्यातील खसाळा -म्हसाळा या गावातून काल 12 सप्टेंबर गुरुवारला सर्वे अभियानाची सुरुवात करण्यात आली.

तर आज लोंणखैरी व खापरिखेडा या गावात ड्रोन द्वारे मोजणी करण्यात आली. मात्र कामठी तालुका भूमी अभिलेख विभागाच्या वतीने इतक्या महत्वपूर्ण असलेल्या गावठाण मोजणी योजनेला प्रसिद्धीपासून वगळल्याने ग्रामस्थात भूमी अभिलेख विभागाविषयी नाराजगीचा सूर वाहत आहे.

महाराष्ट्रात पुणे , औरंगाबाद ,व नागपूर विभागातील गावठान सर्वे अभियानाची गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली असुन विदर्भात नागपुर जिल्ह्यातील सर्वात पहिला गावठान सर्वेअभियान ग्रामपंचायत खसाळा व म्हसाळा येथे जिल्हा अधिक्षक गजानन दाभेराव यांच्या मुख्य उपस्थितीत ड्रोन ला भरारी देण्यात आली.

या ड्रोन द्वारे होणाऱ्या सर्वे अभियानातून गावठाणा अंतर्गत गावात बांधकाम करण्यात आलेल्या घाराची जागा ,जमीन क्षेत्रफळ निर्धारित करण्यात येणार असून गावातील प्रत्येक घरमालकाला जमिनीचया क्षेत्रफळाची आखीवपत्रिका शासनाचे वतीने देण्यात येणार आहेत त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना संपत्तीची आखीवपत्रिका मिळणार आहे घर आखीव पत्रिकेवर ग्रामीण भागातील नागरिकाना शासनाच्या विविध योजनासचा लाभ सुद्धा घेता येणार असल्याचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव यांनी सांगितले सर्वे अभियाना अंतर्गत कामठी तालयक्यातील 77 गावातील सर्वे करण्यात येणार आहेत .

इंग्रजांच्या राजवाटीपासून गावातील गावठाणाची मोजणी झालीच नव्हती यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला गावठाणाची आपली हद्द किती याची माहिती नव्हती यामुळे जागेच्या कारणावरून अनेक वेळा वादविवादाच्या घटना निदर्शनास येत होत्या.यामुळे ग्रामविकास विभागाने प्रत्येक गावठाणाची ड्रोन कॅमेराद्वारे मोजणी करून त्यांचे डिजिटालायजेशन करण्यात येत आहे.गावठाणाची मोजणी झाल्यानंतर गावातील प्रत्येक घरमालकाला डिजीटल मालमत्ता कार्ड दिले जाणार असून या योजने अंतर्गत हद्द गावाचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अभिलेख शासकीय स्तरावर तयार तयार केले जाणार आहे .

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तालुक्यात युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले असून आज पावेतो खसाळा-म्हसाळा, लोणखैरी,खापरिखेडा या गावात गावठाणाच्या मोजणीला प्रारंभ करण्यात आला असून तालुक्यातील एकुन 77 गावात गावठाण मोजणी करायचे आहे.प्रत्येक गावाच्या गावठाण मोजणी झाल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याने प्रत्येक घर आणि शासनाची जागा मोजली जाणार आहे.या मोजणी मध्ये गावातील अंतर्गत रस्ते, घर तसेच मोकळ्या जागेचे नकाशे तयार करून त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.

-बीडीओ सचिन सूर्यवंशी- ग्रामपंचायत चे उत्पन्न वाढणार….गावातील शासकीय जागेचा मालकी हक्क कोणाचा यावरून अनेक वेळा वाद होतात . मात्र नुकत्याच सुरू झालेल्या प्रत्येक गावाची ड्रोन कॅमेराद्वारे गावठाण मोजणीमुळे गावठाणाची हद्द मोजल्यानंतर ग्रा प प्रशासनाच्या जागा आणि ग्रामस्थांच्या जागेची निश्चिती होत आहे तसेच नमुना 8(अ)मालमत्ता कार्ड शी जोडला जाणार आहे तसेच शासकीय जागा ग्रा प प्रशासनाला भाडेपट्ट्याने देता येईल यामुळे ग्रा प च्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होईल .
बॉक्स- तहसीलदार अरविंद हिंगे-जागेच्या मालकी हक्कामुके ग्रामस्थाना गृहकर्ज मिळण्यास मदत होणार आहे तसेच ग्रामपंचायत कडे गावठाणाची अभिलेख उपलब्ध नसल्याने आपलीनेमकी जागा किती आणि ग्रामपंचायत प्रशासनाची किती याची माहिती ग्रामस्थाना कळणार आहे.

संदीप कांबळे कामठी