कन्हान : – नागपुर शहरात झालेल्या मेक अप आर्टिस्ट अवॉर्ड २०२० यात कांद्री कन्हान शहराची मेकअप आर्टिस्ट कल्या णी सरोदे हीने प्रथम क्रमाक पटकावित कांद्री-कन्हान शहराचे नावलौकीक केले.
नागपुर जिल्हयात विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्ती मध्ये कल्याणी सरोदे मेकअप आर्टिस्ट म्हणुन प्रसिद्ध आहेत. आर. एस. ग्रुपचे संस्थापक श्री. जीतु अमरे यांनी नागपूर येथे सेमिनार आयोजित केले असुन या सेमिनार ला नागपुरातील ४०० लोकांनी उपस्थिती दर्शविली होती.
यात ४० स्पर्ध कांनी मेकअप आर्टिस्ट स्पर्धेत सहभाग घेतला असुन स्पर्धेत कांद्री कन्हान च्या रहिवासी कल्याणी सरोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावुन मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड २०२० चा सन्मान प्राप्त करित शहराचे नाव लौकिक केले आहे.
याप्रसं गी बाॅलीवूड मेकअप आर्टिस्ट मुंबई च्या रूबी शेख, कॉसमॉलाजिस्ट सारा शेख, आर.एस.ग्रुपचे संतोष माने, मुंबईचे परिक्षक राहुल, शाहनवाज यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याणी सरोदे यांना मेक अप आर्टिस्ट अवॉर्ड २०२० ने गौरान्वित करून ट्राफी व दहा हजार रूपयांची भेट वस्तु देऊन गौरव करण्यात आला.
४० स्पर्धकात प्रथम क्रमांक पटका विणे एक आव्हान होते परंतु कल्याणी सरोदे यांची प्रबळ ईच्छा शक्ती व अथक परिश्रमा मुळेच प्रथम क्रमांक पटकावित मेकअप आर्टिस्ट २०२० ची मानकरी ठरल्याने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणी सरोदे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले.