Published On : Tue, Jun 25th, 2019

कढोलीत व्यायाम शाळेचे उदघाटन

कामठी: पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नातुन 7 लक्ष रुपयांच्या मंजूर निधीतून कढोली गावातील व्यायाम शाळेच्या साहित्य पुरविण्यात आले होते या व्यायाम शाळेचे उदघाटन माजी जी प सदस्य व भाजप चे कामठी मौदा विधानसभा प्रमुख अनिल निधान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कढोली ग्रा प सरपंच प्रांजल राजेश वाघ, मोबिन पटेल, दिलीप मुळे, रवी रंगारी, करारे,महल्ले, सेवक उईके, राकेश गावंडे, शैलेश ढोके, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.यावेळी व्यायामशाळेला 7 लक्ष रुप्याच्या मंजूर निधीतून साहित्य प्राप्त झाल्याबद्दल माजी जी प सदस्य अनिल निधान तसेच सरपंच प्रांजल वाघ यांनी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानले.

Advertisement

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement