Published On : Sat, Jun 1st, 2019

कढोली ग्रामपंचायत सरपंच प्रांजल वाघ यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सम्माणीत

कामठी: कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कढोली ग्रा प सरपंच प्रांजल राजेश वाघ यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार शिर्डी येथील हॉटेल शांती कमलमधील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा कार्यक्रमात देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच (संघटना)सेवा संघाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील व विविध तालुक्यातील सरपंचांना विविध पुरस्कारांनी सम्माणीत करण्यात आले यानुसार कामठी तालुक्यातील कढोली ग्रा प सरपंच व सरपंच संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रांजल राजेश वाघ यांनी गावात शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना राबविल्या व कढोली गाव आदर्श बनविले त्यांच्या या कार्याची दखल घेत गावाला निर्मल ग्राम पुरस्कार,महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार,ग्राम विकास विभागातर्फे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, मधुर बिमा ग्राम पुरस्कार, केंद्र शासनामार्फत पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, आदर्शगाव पुरस्कार, शाळेला स्वच्छतेचा पुरस्कार, अंगणवाडीला आदर्श पुरस्कार, मिळाले आहेत तसेच ग्रामपंचायत ला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे या कार्याचे कौतुक करोत सरपंच प्रांजल वाघ यांना सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्याचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांच्या शुभ हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सम्माणीत करण्यात आले.

…याप्रसंगी पाटोदयाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील, भूमाता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा तृप्ती देसाई, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, माजी सहकार आयुक्त दळवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सरपंच प्रांजल वाघ यांचे सरपंच संघटनेचे नागपूर जिल्हा तसेच कामठी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले.

Advertisement

– संदीप कांबळे -कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement