
नागपूर : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कबीर गजानन जानभोर या विद्यार्थ्याने पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा यांच्या वतीने आयोजित चौथ्या इंटर-युनिव्हर्सिटी नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा, २०२६ मध्ये प्रतिष्ठेचा ‘बेस्ट मूटर’ पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारासोबत त्याला ₹४०,००० चे रोख पारितोषिकही देण्यात आले.
देशभरातील ८० विद्यापीठे आणि विधी महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १६० स्पर्धकांमधून कबीर ने ‘बेस्ट मूटर’ हा मानाचा पुरस्कार पटकावला.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग, केरळ उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती सौमेन सेन आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती सुरेंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कबीर ह्याला हा पुरस्कार वडोदरा येथे प्रदान करण्यात आला.




