Published On : Thu, Feb 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अंकिता ला मिळविलेला न्याय हा न्यायव्यवस्थेचा विजय- सुनील केदार

हिंगणघाट येथील शिक्षिका अंकिता हिला जाळून मारणाऱ्या नराधम विक्की नगराळे याला शेवटी जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय व मृत अंकिताच्या कुटुंबियांना संतोष मिळाला असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

वर्धा जिल्ह्यातील बहुचर्चित अंकिता हत्याकांडाचा निकाल हा महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व नराधमांना एक चपराक आहे. या निर्णयामुळे अंकिता परत मिळणार नाही; हे सत्य असले तरी मृत अंकिताच्या कुटुंबियांना व समाजाला न्याय व्यवस्थेने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची झालेली हानी ही न भरून निघणारी आहे . परंतु थोड्या फार प्रमाणात या निर्णयामुळे त्यांचे त्यांचे सांत्वन झाले. व कुठे तरी मृत अंकिताच्या आत्म्याला शांती मिळेल.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे खटला लढणारे विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांचे विशेष आभार. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे आणि यापुढे देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय महाविकास आघाडीचे शासन कदापि करणार नाही. शासन अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Advertisement
Advertisement