Advertisement
नागपूर: शहरातील सर्व गेमिंग झोनमध्ये सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने आज नागपुरातील फिदवी कॉम्प्लेक्स, सराफ चेंबरच्या मागे असलेल्या जंप किड्ज़ प्ले सेंटर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी नागपूर प्राधिकरणाने शहरातील सातपैकी पाच गेमिंग झोनला सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे नोटिसा बजावल्या होत्या.
या सर्व गेमिंग झोनला मान्यता प्राप्त नकाशे नसणे तसेच तर अग्निशामक उपकरणे नसणे यासह विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
यापार्श्वभूमीवर नागपूर येथील गेम झोन प्रतिष्ठान महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व सुधारणा अधिनियम २०२३ च्या कलम ८(३) अन्वये सिलबंद करण्यात येत आहे.