Published On : Tue, Dec 21st, 2021
By Nagpur Today Nagpur News

‘उत्‍तर-दक्षिण’चा सुरेल मिलाप, ‘जुगलबंदी’ने जिंकले

Advertisement

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव पाचवा दिवस

नागपूर: भारतीय शास्‍त्रीय संगीताचे उत्तर भारतीय म्‍हणजेच हिंदुस्‍थानी व दक्षिण भारतीय म्‍हणजेच कर्नाटक संगीत असे दोन प्रकार आहेत. या दोन्‍ही प्रकारांचा उत्‍कृष्‍ट मिलाप खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी नागपूरकरांना अनुभवायला मिळाला. बासरी वादक पं. राकेश चौरस‍िया व तबला वादक ओजस आडिया या हिंदुस्‍थानी शैलीच्‍या वादकांसोबच दक्षिण भारतीय शैलीचे बासरी वादक पं. शशांक सुब्रमण्‍यम व मृदंग वादक परुपल्‍ली फाल्‍गुन यांच्‍या ‘जुगलबंदी’ने नागपूरकरांना जिंकले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या पाचव्‍या दिवशी संगीताचार्य पं. द. वी. काणेबुवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने भारतरत्‍न पं. भीमसेन जोशी जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवाचे औचित्‍य साधून ‘उत्‍तर-दक्षिण’ जुगलबंदी चा कार्यक्रम पार पडला.

पाचव्‍या दिवशी कांचनताई गडकरी यांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. याप्रसंगी दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, डॉ. पांडे, राहुल पांडे, डॉ. प्रमोद पडोळे, प्रकाश पोहोरे, श्रीमती तनुजा नाफडे, जोसेफ राव, अरुण कोटेचा, शिव अग्रवाल, पूनम लाला यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. कांचन गडकरी यांच्‍या हस्‍ते कलाकारांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.

आजच्‍या कार्यक्रमाची सुरुवात विश्‍वविख्‍यात बासरी वादक पं. राकेश चौरस‍िया व पं. शशांक सुब्रमण्‍यम यांच्‍या बासरीवादनाने झाली. त्‍यांनी यावेळी विविध रागातील रचना सादर केल्‍या. त्‍यांना तबल्‍यावर ओजस आडिया व मृदंग वर परुपल्‍ली फाल्‍गुन यांनी दमदार साथ दिली.


खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

भक्तिरसाने मंत्रमुग्‍ध झाले श्रोते
कार्यक्रमाच्‍या दुस-या टप्‍प्‍यात विदुषी मंजुषा पाटील, पं. उपेंद्र भट, नागेश अडगावकर, सौरभ नाईक यांनी पं. भीमसेन जोशी यांच्‍या भक्तिरचना सादर केल्‍या. मंजुषा पाटील, नागेश व सौरभ यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’ या भक्तिगीताने दुस-या टप्‍प्‍याची दमदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे निरुपण प्रकाश एदलाबादकर यांनी केले. गायकांनी आरंभी वंदीन, पंढरी निवासा, ज्ञानियांचा राजा, बाजे मुरलीया, काया ही पंढरी, माझे माहेर पंढरी, भाग्यदा लक्ष्मी, तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी या रचना सादर केल्‍या. ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी मंजुषा पाटील व पं. उपेंद्र भट यांनी एकत्र सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Advertisement
Advertisement