Published On : Mon, Nov 18th, 2019

न्यायाधीश माणिक वाघ यांना रामटेक न्यायालयात भावपुर्ण निरोप

Advertisement

कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर व्यक्तीमत्वाचे धनी -ऍड. नवरे यांचे गौरवोद्गार

रामटेक :- रामटेक येथील दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांची महानगर दंडाधिकारी,मुंबई या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांना न्यायालयातर्फे भावपुर्ण निरोप देण्याचा समारंभ नुकताच पार पडला.

Advertisement
Advertisement

कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवरांनी आपले अनुभव कथन करतांना न्यायाधीश व्ही. पी.धुर्वे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश व्ही.पी. धुर्वे या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात माणिक वाघ हे एक उत्तम न्यायधिश, चांगले प्रशासक व मदत करणारे सहकारी आहेत न्यायाधीश माणिक वाघ हे आपल्या प्रशासकीय कार्यात कार्यसुचकता व तत्परता असल्याचे सांगून ते सदैव आपल्या कामात कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर व्यक्तीमत्वाचे धनी असल्याचे प्रतिपादन निरोप समारंभ प्रसंगी केले .

अॅड.अरुण देवळे यांनी आपल्या गौरव परआपल्या ज्युनीअर लोकांमधील असलेल्या कमतरतेची उणीव भासू न देता त्यांना समजून सहकार्य करण्याची भावना व मार्गदर्शन करण्याची वृत्ती जोपासली असे सांगितले. सखोल अभ्यासु व संगीताची आवड जपणारा एक कलावंतही ते होते, न्याय देतांना न्यायदानाचे पवित्र कार्य परिपुर्ण समयसुचकतेने केल्याचे सांगुन पुढील वाटचालीस शुभकामना ही त्यांनी दिल्या.

प्रमुख अतिथी वकील संघाचे अध्यक्ष मुकुंद नेवरे व श्रीमती मनीषा वाघ यांची उपस्थिती होती. न्यायालयीन कर्मचारी तर्फे निरोप देते वेळी कार्यक्रमाला सहाय्यक अधिक्षक अंजली जोशी, अतुल कोतेवार, मेश्राम, वरिष्ठ लिपिक पराते, सुधीर तालेवार, छाया खापरे , कनिष्ठ लिपीक आकाश येरपुडे, ऋषिकांत खडसे, अनिल बहादुरे, विनोद मुळे,अभिलाषा यादव, शुभांगी पोकळे, योगेश महाजन व इतर कर्मचारी, बेलिफ व शिपाई वर्ग उपस्थित होते. कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आकाश येरपुडे यांनी आपल्या मनोगतामध्ये न्यायाधीश माणिक वाघ साहेब मनमोकळे मार्गदर्शक तसेच समजून घेणारे व समजावून सांगणारे अधिकारी असल्याचे सांगितले.

आपल्या पदोन्नती व रामटेक येथील कार्यकालाबाबतीत आपले मनोगत व्यक्त करतांना न्यायाधीश माणिक वाघ म्हणाले की “कर्मचार्‍यांच्या सहकार्यानेच मी न्यायदानाचे कार्य यशस्वी पणे पार पाडू शकलो व रामाच्या पवित्रभूमीत मला पदोन्नती मिळाल्याचा आनंद असून माझ्या रामटेक येथील कार्यकालात सैन्यातील सैनिकाचा जमीनीचा वाद मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून सामोपचाराने सोडविणे व अपंग मुलाला शाळेच्या पर्यवेक्षक म्हणून मतीमंद मुलावर उपचार करून पोलिसाच्या मदतीने त्यांच्या आईवडिलांचा शोध घेवून बालदिनी आईवडिलांच्या ताब्यात देण्याचे महत्वपुर्ण कार्य हातून घडल्याचे समाधान व्यक्त केले”.

सर्वांनी न्यायाधीश माणिक वाघ यांना पदोन्नतीच्या शुभकामना व अभिनंदन करून प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. संचालन व आभार वकील संघाचे सचिव अँड. महेंद्र येरपुडे यांनी केले. ह्याप्रसंगी वरिष्ठ वकील अरुण देवळे , अँड. संजय खंडेलवाल, अँड. अरुण महाजन, अँड. आनंदगजभीये, अँड. कारेमोरे अँड. प्रमोद बांते,ऍड. मयूर गुप्ता व वकील व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement