डेंग्यू विरुद्ध लढाईत सामील व्हा ; नागपूर महानगर पालिकेचे आवाहन
Advertisement
नागपूर : शहरातील सर्व नागरिकांना नागपूर महानगरपालिकेने (NMC ) डेंग्यू विरुद्ध लढाईत सामील होण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर मनपा मार्फत गेल्या पाच वर्षात (२०१८–२०२२) शहरातील डेंग्यू आजारावर परिणाम करणाऱ्या घटकांचा शोध घेण्यात आला आहे.डॉ. जस्मील मुलाणी (हिवताप अधिकारी, मनपा, नागपूर) यांनी संशोधक पथकांच्या सहाय्याने हा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या पथकात राधाकृष्ण बी, (आयुक्त, मनपा नागपूर), डॉ. ज्ञानशंकर मिश्रा (सहयोगी प्राध्यापक, श्वसनरोग विभाग, इं. गांधी, शा.वै.म.व.अ., डॉ. श्याम निमगडे (सहा. संचालक, हिवताप, नागपूर), डॉ. नरेंन्द्र बहिरवार (वैद्यकिय आरोग्य अधिकारी, मनपा, नागपूर) यांचा समावेश आहे. या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकूण २४७० अधिसूचित डेंग्युचे रूग्ण आढळून आले आहे. यादरम्यान ग्यु IgM ELISA Test साठी १७३०६ नमुने तपासले गेले आणि एकुण Test Positivity Rate १४. २७% होता. दर महिन्याला डेंग्युच्या रूग्णांची सरासरी संख्या ७ आहे आणि डेंग्यु Positivity Rate ६.४ % To २४.३% आहे.
डेंग्यु संबाधेत विविध पॅरॉमीटर्सचा वार्षिक कल :-
Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT
97,500/-
Gold 22 KT
90,700/-
Silver/Kg96,700/-
Platinum
44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
पर्यावरणीय घटक आणि उपाय :-या अभ्यासात डेंग्यु तापाच्या प्रसारावर परिणाम करणारे विविध पर्यावरणीय घटक आणि सार्वजनिक आरोग्य उपायांचे परिक्षण करण्यात आले. स्वतःच्या घरात साचलेले पाणी तपासणे आणि त्यामधील डेंग्युचा प्रसार करण्याच्या डासांच्या अळया नष्ट करणे यासाठी नागरिकांचाही पुढाकार असणे आवश्यक आहे.
गप्पीमासे :- गप्णीमासे डासांच्या अळया खातात आणि त्यामुळे पाणी साठवून ठेवलेल्या कंटेनरमध्ये डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. हे दरमहा १७३६५ होते. ज्यामुळे डेंग्युच्या मृत्युची संख्या यशस्वीरित्या कमी झाली.
RMC प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर येथुन प्राप्त करण्यात आली. सरासरी मासिक पाऊस २६.०५ मिमी (इंटरक्वाईल रेंज) मध्ये १.०००० ते ६९.११३५ मिमी इतका होता. ज्यामुळे डासांसाठी प्रजनन स्थळे निर्माण झाली. अवकाळी पावसाने डेंग्युचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे पावसाळयात घरांमध्ये पाणी साचू नये यासाठी लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
डेंग्यु संबधित पॅरामिटर्सचे विविध निर्धारक :-
एखादया एडिस डासांमुळे डेंग्यु ताप येतो. या संशोधनात असे निर्देशनास आले की एखादया भागात एडिस डासांची संख्या (एडिस घनता) तीन महत्वांच्या गोष्टींमुळे प्रभावित होते. डासांच्या अळया असलेले पाणी साठलेल्या कंटेनरची टक्केवारी (कंटेनर इंडेक्स), डासांच्या अळया असलेल्या घरांची टक्केवारी (हाउस इंडेक्स) आणि परिसरातील पावसाचे प्रमाण आहे . डेंग्यु प्रसारमध्ये दोन घटकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. कंटेनर इंडेक्स आणि हाउस इंडेक्स हे निर्देशांक जितके जास्त तितकी डेंग्युचे कैसेस जास्त होती. एडिस डासांची घनता, कंटेनर इंडेक्स आणि हाउस इंडेक्स. गप्पीमासे साठलेल्या पाण्यामध्ये टाकणे. (कंटेनर, कुलर) आणि NMC कर्मचाऱ्यांनी कंटेनर केलेली कार्यवाही यामुळे डेंग्युमुळे मृत्युची संख्या यशस्वीरित्या कमी करण्यात आली आहे.
डेंग्युचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांसाठी उपाययोजना :
१. पुर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत. उदा. फुल बाहयांचे शर्ट आणि पॅन्ट.
२. रात्री झोपतांना मच्छरदाणीचा उपयोग,
३. दारे आणि खिडक्यांवर घटट बसणारे परदे किंवा वायरची जाळी लावावी.
४. पाण्याचे भांडे झाकून ठेवावेत.
५. पाण्याच्या टाके, कंटेनर, कुलर, झाडांची भांडी इ. आठवण्यातुन किमान एकदा रिकामी करून
वाळवावीत. कोरडा दिवस पाळावा.
६. नाल्यांमध्ये कचरा टाकुन चोक करू नये.
७. गटर्स आणि घरांचे छत यांचे देखील व्यवस्थित ड्रेनेज करिता तपासणी केली पाहिजे.. I
या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून डेंग्युचा प्रसार रोखण्यात लोक स्वतःच मदत करू शकतात आणि स्वतःचे व आपल्या कुटूंबाचे रक्षण करू शकतात.