Published On : Fri, May 19th, 2017

जोगेंद्र कवाडेंनी खालचा शब्द वापरून दानवेंवर केली टीका

Danve and Kawade
सावंतवाडी:
रावसाहेब दानवे यांनी विरोध करताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांची जीभ घसरली. विरोधकांच्या संघर्ष यात्रा सावंतवाडीत पार पडली यावेळी कवाडेंनी केलं खालील वक्तव्य. दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना कवाडेंनीही खालच्या भाषेत प्रहार केला.

जोगेंद्र कवाडे नेमकं काय म्हणाले?
कवाडेंनी देखील दानवेंवर खालच्या भाषेत प्रहार केला. ते म्हणाले की, अरे आमची चेष्टा करा. पण फासावर लटकून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची तरी थट्टा थांबवा कमीत कमी. आम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. पण तुमचा तो दानवे आहे की दानव ते माहिती नाही XXX. अशा शब्दात कवाडेंनी टिका केली आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले होते?
राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement