Published On : Tue, Sep 26th, 2017

जिजाऊ, सावित्रीच्या वंदनेने नवरात्रोत्सव साजरा.

कन्हान :जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे जिजाऊ, सावित्री ची वंदना करून आधुनिक पध्दतीने स्त्रीस्वातंत्राचे विविध कार्यक्रम सादर करून नवरात्र्योत्सव थाटात साजरा करण्यात आला.

विश्व कल्याणाची प्रेरणास्थान राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबाच्या प्रेरणेने मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे आधुनिक पध्दतीने आगळावेगळा नवरात्र्योत्सव कार्यक्रमाची राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने सुरूवात करण्यात आली.

आधुनिक आजच्या स्त्रियाची स्थितीवर एक तास महिलानी मनोगत व्यकत केले. जिजाऊ ब्रिगेड कन्हान कार्याध्यक्षा शिवमती छायाताई नाईक हयानी आधुनिक नवरात्रीच्या नऊ दिवसाचे महत्व समजावुन सागितले. नवरात्रीचा पहिला रंग – मातुत्वाचा. दुसरा रंग – स्त्रिभ्रुण हत्या निषेधाचा. तिसरा रंग – मुलगी झाल्यावर मुलगा झाल्याप्रमाणेच आंनद करायचा.चौथा रंग – आपल्या मुलीकडे लायबिटी म्हणुन न पाहता एँसेट म्हणुन पहायच्या वृत्तीचा. पाचवा रंग – मुलीला भरपुर शिकवुन स्वावलंबी करण्याच्या मानसिकतेचा. सहावा रंग – सर्वसामान्यजन कल्याणाचा. सातवा रंग – सत्याच्या मार्गाचा. आठवा रंग – स्त्री,पुरूष समानतेचा. नववा रंग – नव र्निमितीचा. तदनंतर महिलाचे मनोरंजनात्मक अंताक्षरी स्पर्धा,संगित खेळ,गरबा घेण्यात आला.यात प्रत्येक महिलेला आपल्यातील सुप्त कलागुण सादर करण्यास वाव मिळाला.शेवटी पाच महिलानी कार्यक्रमाविषयी सुंदर प्रतिक्रिया व्यकत केल्या.नास्ता चहाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आधुनिक नवरात्र्योत्सव कार्यक्रमास मोठया संख्येने जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित झाल्या असून कार्यक्रमाच्या यशश्वितेकरिता जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले, सर्वशिवमती छायाताई नाईक, पुष्पा चिखले, रंजना इंगोले, कमलाताई गोतमारे, सुनंदाताई दिवटे,मिनाक्षी भोयर, सिंधुताई खुरगे, प्रिती कुकडे,उज्वला लोंखडे ,सुषमा बांते, रूपाली डांगे, योगिता बोरकर, सपना इंगोले, शितल बांते,कल्पना बेलनकर,विजया काळे,छायाताई काकडे, ,मनिषा धुडस,पुष्पाताई लांडगे,सुनंदा लांडगे,पुष्पाताई कोल्हे,सोनाली चिकटे,विधा रहाटे,लताताई जळते,प्रतिमा इंगोले,राजकन्या माटे, कल्पना श्रीखंडे, आशा कैकाडे आदीनी विशेष सहकार्य केले.