Published On : Wed, Jul 29th, 2020

झलके समितीची बैठक संपन्न

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने महापौर श्री. संदीप जोशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्री. ‍विजय (पिंटू) झलके यांचे अध्यक्षतेखाली विविध प्रकरणावर चौकशी करण्याकरीता गठीत समितीची बैठक आज बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत समिती सदस्य विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्री. अभय गोटेकर, विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती सभापती श्री. धर्मपाल मेश्राम, बसपा नेत्या श्रीमती वैशाली नारनवरे व अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे उपस्थित होते.

यावेळी समितीने महानगरपालिके व्दारा निर्माण करण्यात येणा-या के.टी.नगर रुग्णालयांबाबत माहिती घेतली तसेच दर्शन कॉलोनी मध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना नोटीस देण्याचे विषयांवर सविस्तर माहिती घेण्यात आली. दिलेली माहिती असमाधानकारक असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सामान्य प्रशासन ‍ विभागाव्दारे केलेल्या पदोन्नतीबाबत ही विस्तृत अहवाल देण्याचे निर्देश दिले.

स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी अधिका-यांना लेखी उत्तर प्रस्तुत करायला सांगीतले. तसेच विषयाची संपूर्ण माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत उपायुक्त निर्भय जैन, सचिव डॉ. रंजना लाडे, सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, सहाय्यक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण व अनिल गेडाम आदी उपस्थित होते.