Published On : Wed, Apr 17th, 2019

जेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय

मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद होणार आहे.

जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतू आता आपली सेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद होणार आहे. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं शेवटचं विमान उडणार आहे.

Advertisement

जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement