Published On : Sat, May 11th, 2019

चोरीचा कोळशा जेसीबी ने ट्रक मध्ये भरताना रंगेहाथ पकडला

जेसीबी, ट्रक, १८ टन कोळश्यासह चार आरोपीना अटक.,३२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

कन्हान: वेकोलि इंंदर खुली कोळशा खदान नं ६ येथील चोरीचा कोळशा १२ चाकी ट्रक मध्ये जेसीबी ने भरताना सुरक्षा अधिकारी व पोलीसांनी रंगेहाथ पकडुन १८ टन कोळशा, जेसीबी, ट्रक एकुण किंमत ३२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीना विरूध्द गुन्हा नोंदवुन अटक करण्यात आली आहे.

वेकोलि खुली खदान कामठी, इंदर, गोंडेगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात कोळशा चोरी सुरू असून अवैध कोळशा चोरीला सुगीचे दिवस आल्याने गुरुवार (दि.९) ला पहाटे सकाळी सुरक्षा अधिकारी शिवप्रकाश रामफेर सिंग मु गोंडेगाव कॉलोनी यांना इंदर खुली कोळशा खदान नं ६ गोंडेगाव डम्पिंग यार्ड च्या मागे १२ चाकी ट्रक मध्ये जेसीबी व्दारे चोरीचा कोळशा भरत असल्याचे कळल्याने कन्हान पोलीसाना घटनेची माहीती देऊन त्वरित बोलविले. कन्हान पोलीस व सुरक्षारक्षक हयानी घटनास्थळ गाठुन १२ चाकी ट्रक क्र. एम एच ३२ क्यु ५५९१ मध्ये जेसीबी क्र.एम एच ३५ ए जी ४३३२ ने चोरीचा कोळशा भरताना रंगेहाथ पकडुन चार आरोपीना ताब्यात घेतले. ट्रक चालक फरार झाला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी शिवप्रकाश रामफेर सिंग यांच्या तोंडी फिर्यादी वरून जेसीबी अंदाजे किंमत २० लाख, ट्रक किंमत १२ लाख, १८ टन कोळशा ३६ हजार रुपये असा एकुण किंमत ३२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) योगेश राजपुत बेलेकर रा कांद्री २) छोटु उर्फ संदीप वल्द बविंदर सिंग रा वैशाली नगर पाचपावली नागपुर ३) रोहित फुलचंद मेहर रा टेकाडी ४) अनिल प्रेमलाल टेंभरे रा पोलीस लाईन टाकळी नागपुर या चार आरोपी विरूध्द कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंदवुन अटक करण्यात आली असुन ट्रक चालक पसार झाला आहे. या कार्यवाहीत वेकोलि सुरक्षाअधिकारी, सुरक्षारक्षक आणि कन्हान पोलीस स्टेशनचे स पो निरिक्षक प्रमोद पवार, स पो राजेंद्र पाली, मंगेश सोनटक्के, शरद गिते, संजय बरोदिया, मुकेश वाघाडे आदीने सक्रिय सहभाग घेतला असुन पुढील तपास स पो निरिक्षक प्रमोद पवार करित आहे.