Published On : Thu, Jul 2nd, 2020

जयदीप कवाडे यांच्या हस्ते नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.श्री.भूषणकुमार उपाध्याय यांचा सत्कार.

नागपूर:- नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ.श्री.भूषणकुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली कोरोना या महामारी च्या संकटाला नागपूर शहरातील संपूर्ण पोलीस बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस जे योगदान दिले आहे त्याबद्दल आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांचा शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करून संपूर्ण पोलीस खात्याचे अभिनंदन केले आहे.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील पोलिसांनी केलेल्या या अविस्मरणीय कामाबद्दल नागपुरातली जनता कधीच विसरू शकणार नाही.

या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे संघटक कपिल लिंगायत,सचिव विपीन गडगीलवर, सहसचिव निरज पराडकर, पियुष हलमारे,ऋषी विद्या,स्वप्नील महल्ले,महिंद्रा पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.