Published On : Mon, Apr 8th, 2019

ऑनलाइन पध्दतीने गैरसोयीचे परीक्षा केंद्र

पारशिवनी तालुक्यातील निर्धारित ५७ विद्यार्थी वंचित.

कन्हान : – जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा केंद्र ऑनलाइन अल्फा बिटा पध्दतीने परिक्षा केंद्र देण्यात आली. या परिक्षेचे केंद्र देतांना जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना लांब, गैरसोयीचे व काही विद्यार्थ्यांना तालुक्या बाहेरचे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने गैरसोय होऊन अनेक विद्यार्थी गैरहजर राहिल्याने परिक्षे पासून वंचित राहिले.

रविवार दि ६ एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा घेण्यात आली. पारशिवनी तालुक्यात पारशिवनी व कन्हान येथे दोन परिक्षा केंद्र दिलेली होती. पारशिवनी परिसरातील काही विद्यार्थी केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी केंद्रात काही कन्हान केंद्रात तर काही इतरत तसेच कन्हान परिसरातील काही विद्यार्थी धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान च्या केंद्रात काही पारशिवनी तर काही नागपुर ला केंद्र देण्यात आले होते.

धर्मराज विद्यालय कामठी रोडचा पत्ता असल्याने धर्मराज विद्यालय पिवळी नदी कामठी रोड वर जावुन परत धर्मराज विद्यालय कन्हान येथे परिक्षा केंद्रावर यावे लागल्याने चांगलीच धावपळ झाली.

एकाच शाळेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व लांब लांबच्या गावात केंद्र दिल्याने, काही विद्यार्थ्यांना तालुक्या बाहेरचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रविष्ट होण्या करिता विद्यार्थी, शिक्षक व पालकांना त्रास सहन करावा लागला असून दुरवरच्या परिक्षा केंद्रावर उपस्थित होण्या करीता वेळेचा,आर्थिक भुर्दंड व भयंकर त्रास सहन करावा लागला. आणि काही विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहिले.


पारशिवनी तालुक्यातील दोन परिक्षा केंद्रात एकुण ४२३ परिक्षार्थी पात्र होती. १) केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी च्या केंद्रात २६५ विद्यार्थी पैकी २३० विद्यार्थी परिक्षेत सहभागी (प्रविष्ठ) झाले तर ३५ विद्यार्थी गैरसोयीमुळे परिक्षेपासुन वंचित झाले. २) धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान च्या केंद्रात १५८ विद्यार्थी पैकी १३६ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ठ झाले तर गैरसोय झाल्याने २२ विद्यार्थी परिक्षे पासुन वंचित राहिले . पारशिवनी तालुक्यातील दोन्ही केंद्रात ४२३ विद्यार्थी पैकी ३६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले तर विद्यार्थी, शिक्षक व पालकांना परिक्षा केंद्रावर पोहचण्या करिता भयंकर गैरसोय झाली. तर एकुण ५७ विद्यार्थी परिक्षेपासुन वंचित राहिले.