Published On : Tue, Dec 24th, 2019

जरीपटका पेंच ४ गळती दुरुस्ती व भांडेवाडी जलकुंभ स्वच्छता २६ डिसेंबर रोजी

Advertisement

नारा, नारी, जरीपटका व भांडेवाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बाधित

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जरीपटका पेंच ४ फीडर लाईनवरील तथागत चौक येथील मोठी गळती दुरुस्त करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

Advertisement
Advertisement

हे शटडाऊन २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरु होऊन २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पूर्ण होईल, या कामामुळे आशी नगर झोनमधील नारा, नारी व जरीपटका जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील

दरम्यान. लक्ष्मी नगर जलकुंभांच्या स्वच्छतेनंतर, आता मनपा-OCW यांनी आपल्या जलकुंभ स्वच्छता मोहिमेंतर्गत २६ डिसेंबर २०१९ रोजी भांडेवाडी जलकुंभ स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. यानंतर पारडी १ (२७ डिसेंबर), पारडी २ (२८ डिसेंबर) व सुभान नगर (३० डिसेंबर) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement