Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दाखविली माणुसकी

रस्ते अपघातातील जखमी महिलेच्या मदतीला धावले
Advertisement

नागपूर,: “जन सेवा ही परम सेवा” या ब्रीदवाक्याची प्रचीती आज नागपूरकरांना अनुभवायला मिळाली, नाईक तलाव परिसराची पाहणी करून मनपा मुख्यालयाच्या दिशेने येत असताना, शहराच्या प्रथम नागरिक मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी तत्परता दाखवत एका अपघातग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला.

नाईक तलाव परिसराचे निरीक्षण आटोपून महापौरांचा ताफा सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालयाकडे मार्गस्थ होत होता. दरम्यान, श्रीमती विभा पुंडलिक बांगरे (वय ५५ वर्ष) यांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा इजा झाली असल्याचे पाहताच, महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोणत्याही प्रोटोकॉलची वाट न पाहता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी स्वतः गाडीतून उतरून जखमीची विचारपूस केली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना आधार दिला आणि तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

केवळ मदत करून न थांबता, जखमी श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत याची खातरजमा महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली. लगेच मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी श्रीमती विभा पुंडलिक बांगरे यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापौरांच्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ‘पद आणि प्रतिष्ठा’ बाजूला ठेवून त्यांनी दाखविलेली ही माणुसकी खऱ्या अर्थाने जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Advertisement

“लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने मदत मिळणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. आज त्या भगिनीला वेळेत मदत करता आली, याचे मला मोठे समाधान आहे.

श्रीमती निता ठाकरे,

महापौर, मनपा नागपूर

Advertisement
Police Attack: विवाद शांत कराने पहुंचे हवलदार पर चाकू से हमला #News #PoliceAttack #MaharashtraCrime

Police Attack: विवाद शांत कराने पहुंचे हवलदार पर चाकू से हमला #News...

अमरावती में तेंदुए का आतंक! फिर 2 लोगों पर हमला #LeopardAttack #AmravatiLeopard #MaharashtraNews

अमरावती में तेंदुए का आतंक! फिर 2 लोगों पर हमला #LeopardAttack #AmravatiLeopard...

ईद-उल-मिलाद पर नांदेड में भव्य जुलूस, अमन-शांति और भाईचारे की दुआ  #EidMiladUnNabi #EidMilad #News

ईद-उल-मिलाद पर नांदेड में भव्य जुलूस, अमन-शांति और भाईचारे की दुआ #EidMiladUnNabi...

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges