Published On : Fri, Jun 1st, 2018

‘आरएसएसचे’ अध्यक्ष जनार्दन मून यांचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना ‘संघा’ विषयी पत्र

Advertisement

Janardan Moon

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नामक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी पुन्हा एकदा गैरनोंदणीकृत त्यांच्या मते नकली ‘आरएसएस'(संघ) विरोधात शड्डू ठोकला आहे. येत्या ७ जून रोजी रेशीमबाग मैदान, हेडगेवार स्मृती मंदिर परिसर येथे आयोजित संघ प्रचारकांच्या दीक्षांत समारंभात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे प्रमुख अतिथीपद भूषवणार आहेत. जनार्दन मून यांनी प्रणब मुखर्जींना पत्र लिहून त्यांना संघाच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यावर पुनर्विचार करण्यास सुचविले आहे.

आपल्या पत्रात ते म्हणतात की, आरएसएसची (संघ) अधिकृत नोंदणी झाली नसून ही संघटना काळ्या पैश्यावर चालते, असा आरोप मून यांनी केला. आरएसएसची अधिकृत नोंदणी नसल्याने त्याच नावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था (आरएसएस) स्थापना केली असून ती ऑनलाइन नोंदणीकृत असल्याचा दावा मून यांनी केला आहे. तसेच नकली आरएसएसवर बंदी यावी यासाठी अभियान छेडल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा पुरवून भाजप सरकार जनतेच्या पैश्यांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप देखील मून यांनी आपल्या संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

Letter
Letter


—Swapnil Bhogekar