Published On : Sat, Aug 29th, 2020

दारूची दुकाने उघडता, अन् मंदिरे बंद ठेवता?

भाजपाचा राज्य शासनाला सवाल, मंदिरांमध्ये आंदोलने
कोराडी मंदिरात बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन

नागपूर: गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध समाजाची मंदिरे राज्य शासनाने बंद केली आहेत.

संचारबंदी संपवून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरु करण्यात येत आहेत. पण मंदिरे मात्र अजूनही बंदच ठेवण्यात आली. एकीकडे दारुची दुकाने सुरु करण्यास या शासनाने परवानगी दिली. मात्र लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली विविध धर्मियांची मंदिरे मात्र अजूनही उघडण्यास शासनाने परवानगी दिली नाही. याविरूध्द भारतीय जनता पक्षातर्फे आज शहर आणि जिल्ह्यात विविध मंदिरांमध्ये घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.


भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात आंदोलन करण्यात आले तर शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात साई मंदिरात आंदोलन करण्यात आले. देशातील सर्व शासनाने मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली. पण महाराष्ट्र शासन मात्र सर्व धर्मियांवर अन्याय करीत आहेत. यामुळे भाविक चिडून आहेत. राज्यातील विविध धर्माचे भाविकांची मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे.

जी नियमाावली तयार करायची आहे, ती तयार करा पण राज्यातील सर्व समाजाच्या मंदिरांची दारे उघडा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. हे आंदोलन शहर व जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरासमोर जाऊन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने नागरिक व भाजपाचे कार्यकर्ते भगव्या टोप्या व भगवे दुप्पटे घालून सहभागी झाले होते.