Published On : Wed, Sep 18th, 2019

भाजप कार्यकर्ता भाग्यशाली,योग्य पक्षात: जे.पी.नड्डा

जगाच्या पाठीवर सतरा कोटी सदस्यसंख्या असणारा एकही पक्ष् नाही

नागपूर: भारतीय जनता पक्षात कार्यकर्ते हे स्वत:च्या आवडीने, कधी परिस्थितीमुळे तर कधी अकस्मात पक्ष्ात प्रवेश घेतात. विद्यार्थी जीवनात असताना आवड म्हणून पक्ष्ात येतात,कोणी मित्र किवा नातेवाईक पक्षात आहे म्हणून पक्षात येतात तर कोणी पक्षाची विचारधारा पटतेय म्हणून पक्षात येतात,तुम्ही या तीन कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी पक्ष्ात आले असले तरी विश्‍वास ठेवा,तुम्ही योग्यपक्षात आला आहात, भाजप कार्यकर्ता हा यासाठीच भाग्यशाली ठरतो,असे विधान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष् जे.पी.नड्डा यांनी केले.

ते भाजप शहर कार्यकारीणीतर्फे भट सभागृहात आयोजित ‘विदर्भ विजय संकल्प मेळाव्यात’ प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,सरोज पांडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महापौर नंदा जिचकार,शहराध्यक्ष् प्रवीण दटके,महामंत्री संदीप जोशी आदी सह समस्त नेते व पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना नड्डा म्हणाले,की वामपंथी असो किंवा काँग्रेस विचारधारा,आपापल्या विचारधारेप्रती ते प्रामाणिक होते.३०-४० वर्षांपूर्वी मी जेव्हा त्यांना म्हणायचो ‘लाल सलाम’सोडून ‘वंदे मातरम’ म्हणून देशाच्या मुख्य विचारधारेत या, तेव्हा त्यांना त्यांचीच विचारधारा देशात क्रांती आणणार असं वाटायचं,आज जेव्हा ते भेटतात तेव्हा सांगतात ‘तुम्ही बरोबर होता,आम्ही चुकलो’. त्यांच्या विचारधारेतच खोट होती. समाज किवा देशाला देण्यासाठी चांगले उपकरण ते नाही होऊ शकले. याच कारणामुळे भाजपची सदस्य संख्या ही ११ कोटींपर्यंत पाेहोचली आहे. जगातील एकूण १९३ देशांपैकी ७ देश सोडले तर भाजपची सदस्य संख्या ही सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्ष्ा जास्त आहे. आमचा रेकॉर्ड कोणी तोडत नाही, आमचा रेकॉर्ड आम्हीच तोडतो,नुकतेच भाजपाच्या १ लाख ८४ हजार विस्तारकांनी ५४ दिवसात १९ लाख सदस्य नव्याने जोडले. आपल्याकडे नेता आहे, नीयत आहे, कार्यक्रम आहे, कार्यकर्ता आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य वातावरण आहे.

देशात १३०० राजकीय पक्ष् आहेत त्यात ७ राष्ट्रीय तर ५८ प्रादेशिक पक्ष् ही आहेत, आज काँग्रेस सोडून एकाही पक्ष्ाकडे विचारधारा नाही,इतर सगळे पक्ष् हे परिवारवादावर उभे आहेत.आपल्या पक्ष्ात पोस्टर चिपकवणारा गडकरी सारखा कार्यकर्ता मंत्री होताे,मोदी सारखा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान होतो,इतर कोणत्याही पक्ष्ात हे घडत नाही.ही कार्यकर्त्यांची ताकद आहे, इतर देशातील राजदूत भारतीय जनता पक्ष्ाच्या संघटनेचाच अभ्यास करण्यासाठी येऊन भेटतात, तुम्ही ७ वरुन १७ कसे झाले? असा त्यांचा प्रश्‍न असतो तेव्हा त्यांना सांगतो, ही संख्या आणखी वाढेल याचे कारण पक्ष् आणि सरकार यांचा योग्य समन्वय असेण हे होय.सरकारच्या नीतीला पक्ष्ाचा कार्यकर्ता हा जमीनीस्तरावर पोहोचवतो म्हणून हे घडतं. दूसरा प्रश्‍न हा त्यांचा भाजपाच्या शिस्तीविषयी असतो. शिस्त ही आतून येते ती भाषणातून येत नाही, सर्वोच्च पदावरील नेता हा स्वत: शिस्तबद्ध अाहे म्हणूनच या पक्ष्ाचा कार्यकर्ता देखील शिस्तबद्ध असल्याचे नड्डा हे म्हणाले.

विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी ज्या जल्लोषात माझे स्वागत केले ते पाहून निवडणूकांचा ज्वर सुरु झाला असल्याची खात्री पटली. या नंतर स्कूटर रॅली निघाली या वरुन महाराष्ट्रात पुन्हा आपण सरकार बनवतोय हे कळाले.छत्रपतींसारख्या वीराची आणि डॉ.आंबेडकरांची महाराष्ट्र ही भूमी आहे.मी त्यांना वंदन करतो.

तत्पूर्वी सरोज पांडे यांनी आपले मत व्यक्त केले. प्रा.अनिल सोले यांनी मंच संचालन केले. विमानतळावर नड्डा यांचे शहर भाजपतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व जे.पी.नड्डा हे दिल्लीवरुन एकाच विमानाने नागपूरात आले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात गडकरी यांनी नड्डा यांचे स्वागत विमानतळावरच केले. यानंतर शिवाणी दाणी यांच्या नेर्तृत्वात विमानतळ ते दीक्ष्ाभूमीपर्यंत भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली.
दीक्ष्ाभूमीवर नड्डा यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले. यानंतर ते संदीप जोशी यांच्या झेपतर्फे चालविला जाणारा उपक्रम ‘दिनदयाल थाली’ याची त्यांनी मेडीकल येथे माहीती घेतली. भट सभागृहात कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्याला संबोधित केल्यानंतर त्यांनी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मारकाचे वंदन केले.

गडकरी हे तर माझेही प्रेरणास्त्रोत
गडकरी हे माझेही प्रेरणास्त्रोत आहेत. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना गडकरी यांनीच मला दिल्ली येथे पुन्हा संघटनेच्या कामासाठी आणले. संघटनेच्या कामासाठी मी मंत्री पद ही सोडले. गडकरी यांचा प्रभाव माझ्या जीवनावरही झाला असल्याचे नड्डा हे म्हणाले. आपण खूप उतार पाहीले आता चढावाची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सर्वोच्च अजून बघायचे आहे’-
तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात,अजून आपल्याला ‘सर्वोच्च’बघण्याचे बाकी आहे,असे आपले गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सांगितले आहे.‘जहां हूये बलिदान मुखर्जी वो कश्‍मीर हमारा है’ असा नारा आपण गेल्या अनेक दशकांपासून देतो आहे ते स्वप्न ५ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्ण झाले. कलम ३७० रद्द झाल्यामुळे आदिवासींसाठी भारतात असणारा कायदा तेथेही लागू झाला, वाल्मीकी समाजाला न्याय मिळाला. इतर राज्यात लग्न करणार्या मुलींना संपत्तीत हक्क मिळाला,ट्रीपल तलाक असो,काँग्रेसने कधीच यावर कायदे बनवले नाहीत आणि तरीही तो पक्ष् दलित,शोषितांचा कैवारी म्हणून घेतो. डॉ.आंबेडकर यांचा स्वत:चा कायदेमंत्री म्हणून कलम ३७० ला विरोध होता मात्र काँग्रेसने गोपालस्वामी अयंगार यांच्याद्वारे कलम ३७० संविधानात घूसवले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद यांचे खरे तर आम्ही ऋणी असायला हवे ज्यांनी त्या वेळी हे कलम ‘तात्पूरते’(अस्थायी)करुन घेतले. मोदींच्या काळात देशाच्या हिताचे १०४ कायदे पारित झाले. आपण भाग्यशाली आहोत,जे बटण दाबून तुम्ही गडकरी यांना संसदेत पाठवले, त्यांनी संसदेतील बटन दाबून हे कलम हद्द पार केले. चाळीस वर्षांनंतर पुढच्या पिढीला हे आपण आता गर्वानी सांगू शकतो. युएपीएच्या कायद्यात पूर्वी फक्त संस्थेला दहशतवादी घोषित करता येत होते,आता व्यक्तिला देखील दहशतवादी ठरवता येते.मोदींच्या नेर्तृत्वाने हा देश सुरक्ष्ति केले.आता एनआयए देशाबाहेर देखील चौकशी करु शकते.या डबल इंजिनचे खूप फायदे आहेत.गडकरी व फडणवीस यांच्या शहरात रस्ता,रस्त्यावर रस्ता, त्यावर मेट्रो पोहोचली, म्हणूनच येत्या निवडणूकीत यावेळी पण ‘सही बटन’दाबण्याचा त्यांनी सूचक ईशारा दिला.

सर्वोच्च का है अभी इंतजार..कदाचित बोलता बोलता त्यांनी अयोध्येतील राम मंदिराकडेच संकेत दिला असावा. पहील्यांदा जम्मू-काश्‍मीरमध्ये आदिवासींसाठी सात ते आठ जागा आता राखीव राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेता व्हायचे असेल तर बूथची माहीती ठेवा-
अनेक जण भेटायला येतात तेव्हा त्यांना बूथ विषयी मी आधी विचारणा करतो. बूथवर एकूण किती मतदार आहेत,यात पुरुष किती,महीला किती, तरुण किती, मला गोलमोल उत्तर मिळतात तेव्हा हेच सांगतो,नेता व्हायचे असेल तर आधी बूथची सखोल माहिती ठेवा. मतांमध्ये परिवर्तन तेव्हाच घडेल जेव्हा कार्यकर्ता हा मतदारापर्यंत पोहोचेल.माझ्याकडे बायोडाटा देऊन उपयोग नाही. आपल्या पक्ष्ात जन्मपत्री बघितली जाते ती ही अनेक पंडीतांकडून तपासली जाते,अशी कोटी त्यांनी केली. प्रत्येकाला पाच-पाच बूथ वाटून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तुमचे फक्त दोन डोळे आहेत मात्र तुमचं काम बघायला हजारो डोळे असतात. पक्ष्ाकडून मला काय मिळेल याचा विचार न करता मी पक्ष्ाला काय देऊ शकतो याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा. आपण लग्नात जातो तेव्हा आपल्याला बसायला कोणी खूर्ची देतो का? माझं काय होईल हा विचार कार्यकर्त्यांनी सोडून दिला पाहीजे आणि पक्ष्ाचं काय होईल याचं चिंतन केल्यास आपोआप तुमचे ही भले होईल,असे नड्डा म्हणाले.

बंडखोरांना गडकरींचे चिमटे-
सत्ता हे आपलं अंतिम ध्येय नाही. राष्ट्र बदललं पाहीजे. पक्ष्ासाठी आजवर हजारो कार्यकर्त्यांनी माझ्यापेक्ष्ाही हजारपटीने त्याग केला आहे. आजही ते कोणत्याही पदा वर नाही. अश्‍या नि:स्पृह, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांमुळेच पक्ष्ाला हे यश मिळाले आहे. मी स्वत: जनसंघाच्या काळात ऑटोरिक्शात बसून प्रचार करत होतो,तेव्हा काँग्रेसचे समर्थक घरावरुन मला दगडं मारत होते. पण पक्ष्ाप्रति,विचारधारेप्रति तो एक जूनून होता,आस्था होती,हिंमत होती,प्रेरणा होती. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वत: मंत्री पद सोडून जनसंघाची स्थापना केली. आता आपण सत्तेच आलो असलो तरी लक्ष्ात ठेवा हे आधीच्या कार्यकर्त्यांमुळेच शक्य झाले आहे. पंतप्रधान माेदी यांची ही सुरवात कार्यकर्ता म्हणूनच झाली आहे. त्यामुळे विजयाचे संपूर्ण श्रेय हे कार्यकर्त्यांनाच जातं. विजया नंतर अंहकार देखील येऊ देऊ नका. युधिष्ठिरने महाभारताचे युद्ध जिंकल्या नंतर कौरवांसाठी देखील तर्पण केले होते. जुना इतिहास हीच आपली प्रेरणा असते. आपल्या पक्ष्ाचा संघर्षाचा इतिहास हीच आपली प्रेरणा आहे. इतिहास हा रक्त,घाम आणि परिश्रमानेच लिहला जात असतो. पक्ष्ाला ही अमूल्य विरासत मिळाली आहे.

तिकीट कोणाला मिळेल हे पक्ष् तय करेल. एका खूर्चीवर दहा माणसे बसू शकत नाही. ज्यांना तिकीट मिळत नाही ते सरळ माझ्याकडे येऊन विचारतात ‘माझ्यात काय कमी आहे? मी इतके दिवस काम केलं त्याचे काहीच फळ नाही का? निवडणूकांच्या आधी पेक्ष्ा निवडणूकांच्या नंतर जास्त समजवावं लागतं,जे फार कठीण काम आहे. खूप भावूक होतात माणसे. येत्या निवडणूकीत नड्डा साहेब आणि देवेंद्र तिकीट देतील.

स्वतंत्र,निष्पक्ष् निर्णय घेतील. आमच्या पक्ष्ात कोटा नाही,हा कार्यकर्त्यांचा पक्ष् आहे. एखादा निर्णय चूकतो, माझे देखील निर्णय चुकले आहेत. त्यावेळी समजलेच नाही, चूका होऊ शकतात मात्र एखाद्याचे तिकीट मुद्दामून कापणे हे पक्ष्ात चालणार नाही. तिकीट मिळेपर्यंत सर्वच दावेदार आहेत मात्र ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे नंतर भक्कमपणे उभे राहा. नागपूरात माझ्यापेक्ष्ा जास्त चांगले असे एक हजार कार्यकर्ते असतील ज्यांनी माझ्यापेक्ष्ा जास्त परिश्रम केलेत. ही कार्यकर्त्यांचीच कसौटी असते जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय होतो. तोच क्ष् ण असतो जेव्हा त्यांच्या खर्या स्वभावाची परिक्ष्ा होते. आता ही सभागृहात तिकीटांचे अनेक दावेदार बसले आहेत त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. फक्त एक वेळा संधी द्या पुन्हा तिकीट नाही मागणार, असे म्हणारेच पुन्हा परत येतातच. छोटू भैया धाक्रस यांना तिकीट मिळणार होते मात्र त्यांनी ठामपणे तिकीट नाकारुन माझ्या ऐवजी नव्या व्यक्तिंमागे पक्ष्ाचा झेंडा घेऊन उभे रहा. विदर्भात ६२ जागा आहेत, भाजप-शिवसेना युती होईल…असं मला वाटतंय..मात्र कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायचे आहे हा संकल्पच येथून घेऊन जा,असे गडकरी म्हणाले. देवेंद्रच्या नेर्तृत्वात पुन्हा गेल्या वेळे पेक्ष्ाही जास्त जागांनी मजबूत सरकार बनवायची आहे. नड्डाजी व देवेंद्र यांनी ज्यांना कोणाला तिकीट दिले तरी हे कार्यकर्ते १०० टक्के उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील असा शब्द मी तुम्हाला देतो.

यावेळी त्यांनी आपातकालमधील कार्यकर्त्यांचा त्याग यावर सखोल प्रकाश टाकला.आमचा पक्ष् संपला असे हिणवणारे लोकच आत पक्ष्ाची झेप उघड्या डोळ्यांनी बघतात आहेत.विदर्भात तर अश्‍या कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे ज्यांना पक्ष्ाकडून कधीच काहीच मिळाले नाही.मलाही माझ्या कुवतीपेक्ष्ा खूप जास्त पक्ष्ाने दिले असल्याचे गडकरी हे म्हणाले.