Published On : Wed, Jun 17th, 2020

पाऊस आला रे आला… शेतकर्यांचा चेहऱ्यावर हास्य फुलवीले…. शेतीच्या कामाला झाली सुरुवात …..

रामटेक : येरे येरे पावसा म्हणून आनंदाने बागडणारी लहान मुले ज्याचे स्वागत करतात तो पाऊस! शेतकरी आशेचा डोळ्यांनी ज्याची वाट बघत असतो तो पाऊस!

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांना आवडतो. पावसाचे सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो नांगरणी पेरणी करताना शेतातील पावसामुळे झालेल्या चिखल तुडवताना त्याला त्रासदायक वाटत नाही, पिकांची भविष्याची स्वप्ने तो पाहत असतो तो मनोमन सुखावतो परंतु यावर्षी समाजातील प्रत्येक घटकाला लॉक डाऊन मुळे त्रस्त झालेला आहे.

यातील एक घटक म्हणजे शेती आणि शेतकरी. राज्यातील एकंदरीत शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या वातावरणातील बदल वेळी अवेळी पडणारा पाऊस आणि बाजारातील होणारे चढ-उतार यामुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातल्या ग्रामीण भागात पावसाचे आगमन झाल्याने गर्मिने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे.


” कोरोना च्या सावटाखाली शेतकरी शेतात काम करण्यासाठी उतरले होते. तयारीसाठी शेतकर्यांनी खात व बियाणांची खरेदी केली होती. फक्त पावसाची प्रतीक्षा होती जी आता संपली आहे. “लवकरच आम्ही पिकांच्या श्रीगणेशाला सुरुवात करू” असे आमच्या प्रतिनिधींशी तालुक्यातील शेतकरी, मीना चिंचोलकर , धनराज मेहरकुळे , बेबी जयस्वाल राऊत, अनिता वाहाने , चंद्रशेखर वाडिवे , भाऊराव नारनवरे, जगन्नाथ मडावी तसेच पिपरिया ,अंबाझरी, दुधाळा, येतील शेतकऱ्यांनी आपले आपले मत व्यक्त केले.