Published On : Mon, Jan 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

ज्येष्ठांना, दिव्यांगांना सर्व प्रकारचा आधार देणे हे सामाजिक कर्तव्य : ना. गडकरी

खासदार हेल्थ कार्ड योजनेचा शुभारंभ
40 हजार ज्येष्ठांनी भरले योजनेचे फॉर्म
वयश्री योजनेतून 25 हजारांना देणार उपकरणे

नागपूर: समाजातील ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना समाजातील सर्वांसोबत सन्मानाने जगता यावे व त्यांना जीवनात जगण्याचा आनंद मिळावा या भावनेने खासदार हेल्थ कार्ड सुरु करण्यात आले असून प्रत्येक वस्तीतील ज्येष्ठ नागरिकाला आधार देणे, वैद्यकीय सुविधा देणे तसेच सर्व प्रकारे मदतीचा हात घेऊन त्यांच्या मागे उभे राहणे हे सामाजिक कर्तव्य असून ते आपण निश्चितपणे पार पाडू असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खासदार हेल्थ कार्ड या योजनेचा आज ना. गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान 5 ज्येष्ठ नागरिकांना आज ना. गडकरी यांच्या हस्ते हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. ना. गडकरी यांच्या निवासस्थानीच हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, आ. ना. गो. गाणार, आ. मोहन मते व भाजपाचे ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष राजेंद्र लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, काही दिवसांपासून भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि वैद्यकीय आघाडीच्या प्रमुखांनी ही योजना तयार केली. आज सोनोग्राफी, किडणी, हृदय शस्त्रक्रिया, एमआरआय, सीटी स्कॅन अशा विविध तपासण्यांसाठी खूप पैसा लागतो. ज्येष्ठ नागरिक हे सेवानिवृत्त असल्यामुळे त्यांच्याकडे एवढा पैसा उपलब्ध होऊ शकत नाही. या योजनेच्या माध्यमातून अशा सर्व तपासण्या ज्येष्ठांना सवलतीच्या दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. या योजनेसाठी मी विविध डॉक्टरांना व रुग्णालयांना पत्र पाठवून ज्येष्ठांना अशा सुविधा सवलतीत उपलब्ध व्हाव्यात यासाठी विनंती केली. डॉक्टर मंडळींनी माझी विनंती मान्य केली, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- वयश्री योजनेतून 25 हजार लोकांना 22 प्रकारची विविध उपकरणे नि:शुल्क देण्याची योजना असून लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. खासदार हेल्थ कार्डसाठी शहरातील विविध भागातून 40 हजार ज्येष्ठ नागरिकांनी खासदार हेल्थ कार्डचे फॉर्म भरले आहे. यापैकी 9 हजार लोकांचे कार्ड तयार झाले असून त्यांना ते वितरित करण्यात येतील. खासदार हेल्थ कार्डसारखे मोबाईल अ‍ॅपही तयार केले जात असल्याचे ते म्हणाले.

राजकारण न करता समाजकारण आणि विकासकारण केले पाहिजे असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या योजनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येईल असाच प्रयत्न आहे. स्मार्ट शहरांप्रमाणे आता गरिबांसाठी स्मार्ट व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. 5 लाख रुपयात हे घर असेल. या घरात गरम पाणी व वीज नि:शुल्क असेल. सेवानिवृत्तांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे काम आपले आहे, या भावनेतून हे काम सुरु झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

फुटाळा तलावात निर्माण होत असलेले रंगीत कारंजे व साऊंड शो चा पहिला शो ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी नि:शुल्क करण्याचा मनोदय व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- दिव्यांगांना फिरण्यासाठी एक डबल डेकर बस आपण देणार आहोत. त्यांनाही फिरण्याचा आनंद यामुळे मिळेल. बॉटनिकल गार्डनमध्ये जगातील सर्वात मोठा व सुंदर फुलांचा बगिचा तयार करण्याचे आपण ठरवीत आहो. तेलंखेडी येथेे लहान मुलांसाठी सुंदर बगिचा बनविण्याचाही प्रयत्न आहे. एकूणच हा संपूर्ण भाग पर्यटनाचे झोन तयार होईल. नागपूरचे आकर्षण जगाच्या स्तरावर जाईल. नागपुरात खेळांची 200 मैदाने पूर्ण झाली आहेत. या मैदानावर ज्येष्ठांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना इतरांप्रमाणे आनंदाने जीवन जगता आले पाहिजे व त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

या कार्यक्रमात खासदार हेल्थ कार्डचे वाटप रामसेवक दुबे, काशीनाथ बाळबुधे, हारूखभाई घाणीवाला, श्रीराम ठोंबरे, श्रीमती सुशीलाबाई दुलेवाले, श्रीमती सुंदराबाई सोयाम, गोविंद कसोरिया, लक्ष्मीबाई समुद्रे, विजय गुप्ता, नागकृष्णा रेड्डी, गजानन वाठ, युवराज बोंडे, रामचंद्र वाघमारे, अशोक पाटील, रुपराव वंजारी, धर्मदास कांबळे, राजेंद्रकुमार विश्वकर्मा, अशोक हनुमंते, श्रीराम मते, बबनराव वानखेडे, भास्कर तिरपुडे, हरिश्चंद्र चोपकर आदींना ना. गडकरी व दत्ताजी मेघे यांच्या हस्ते हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.

Advertisement
Advertisement