Published On : Mon, Oct 5th, 2020

इस्कॉनच्या वर्ल्ड होली नेम फेस्टिव्हलचा समारोप.

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेचे (इस्कॉन) हरिनाम संकीर्तन मंत्रालयाचे मंत्री श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड होलीनेम फेस्टिव्हल जगभरात इस्कॉन मंदिरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमात दररोज सकाळी ८ ते ९.३० या काळात ज्येष्ठ संतांनी श्रीमद भागवतावर प्रवचन दिले, त्यानंतर दररोज संध्याकाळी ५ ते ९ या काळात जप रिट्रीट, किर्तन मेळा, तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक् संचालन लन्दन निवासी एच. जी. जगन्नाथ किर्तानानंददास नि केला.

इस्कॉन हरिनाम संकीर्तन मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. श्यामसुंदर शर्मा म्हणाले की, कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी जपाथॉन (विश्व जाप महायज्ञ) झाला. यात जगातील सर्व इस्कॉन मंदिरातील भक्तांनी 24 तास हरे कृष्ण महामंत्राचा जप केला. या व्यतिरिक्त, जगातील अनेक भागांतील 1,31,031 लोकांनी, जे इस्कॉनशी जुळलेले नव्हते त्यांनी देखील या जप महायज्ञात एका वेगळ्याच प्रकारे योगदान दिले.

या लोकांनी स्वत:चे व्हिडिओ बनविले ज्यात त्यांनी आपली नावे, आपल्या शहराची नावे, आपल्या राज्याची आणि देशाची नावे सांगितली आणि ते म्हणाले “मी हा हरे कृष्ण महामंत्र प्रेम आणि जागतिक शांततेसाठी समर्पित करीत आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम “राम राम हरे हरे.” असे बोलून त्यांनी स्वत: चा एक व्हिडिओ तयार केला आणि 700 पेक्षा जास्त इस्कॉन दूतावासांद्वारे fortunate-people.com या वेबसाइटवर अपलोड केला. उपरोक्त दिलेली संख्या ही केवळ कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसाची आहे. आम्हाला अद्यापही व्हिडिओ प्राप्त होत आहेत. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत की सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये मी जप यज्ञ आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात लोक या यज्ञात सहभागी होत आहेत.

ग्लोबल कीर्तन कनेक्ट हे या संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण केंद्र होते. हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता किर्तनसह इस्कॉन ऑकलंड (न्यूझीलंड) येथे सुरू झाला. त्याच टाईम झोनमधील इतर देशांमधील भक्तांनी देखील त्याचवेळी कीर्तन सुरू केले. हा कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत चालला. त्यानंतर ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया), टोकियो (जपान), पेंगयॉँग (मलेशिया), बँकॉक (थायलंड), काठमांडू (नेपाळ), मायापूर, वृंदावन (भारत) , दुबई (यूएई), मॉस्को (रशिया), रिजेका (क्रोएशिया), लंडन (यूके), घाना (पश्चिम आफ्रिका), व्हँकुव्हर (कॅनडा), साओ पुलो (ब्राझील), अलाचुआ (यूएस), वॉशिंग्टन, डल्लास, डेन्वर, सिलिकॉन व्हॅली, न्यूयॉर्क, ह्युस्टन, होनोलुलु येथेही हा कार्यक्रम झाला आणि अखेर अमेरिकन माईनर बेटे येथे या कार्यक्रमाची सांगता झाली. येथेही हा कार्यक्रम दुपारी 12 ते १ या काळात झाला. प्रत्येक देशात इस्कॉनच्या प्रख्यात व्यक्तींनी या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. 24 तासांच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान सूर्यास्त झालाच नाही.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सर्व इस्कॉन मंदिरांचे अध्यक्ष, इस्कॉन संकीर्तन मंत्रालयाचे सचिव एकलव्य दास, श्री चैतन्य महाप्रभु दास, परंपरा वाणी दास, दीनानुकम्पा देवी दासी, कृष्णभक्त दास, पद्ममाली दास, माधवी गौरी देवी दासी, स्वरूपानंद दास, गोविंद चरण दास आणि इतर अनेक भाविकांनी अथक परिश्रम घेतले. नागपूर चे 350 परिवाराने ह्या कार्यक्रमा च्या लाभ घेतला.

डॉ. श्याम्सुन्देर शर्मा
प्रवक्ता इस्कॉन हरीनाम संकीर्तन मिनिस्ट्री
मोबाईल 9373102405