Published On : Sat, Feb 6th, 2021

फ्रंटलाईन कर्मचा-यांना लसीकरणाची सुरुवात

नागपूर : केन्द्र शासनाचे निर्देशानुसार फ्रंटलाईन अधिकारी व कर्मचा-यांना कोव्हिड लसीकरणाचा प्रारंभ शुक्रवारी इंदिरा गांधी रुग्णालय आणि पाचपावली स्त्री रुग्णालय केन्द्रात झाला. नागपूर महानगरपालिकेचे व पोलिसांचे अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येईल.

शुक्रवारी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री.मिलींद मेश्राम, श्री. महेश मोरोणे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर व अनेक स्वच्छता कर्मचा-यांसह अधिकारी व कर्मचा-यांनी लस घेतली. पाचपावली व इंदिरा गांधी रुग्णालयमध्ये लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

यावेळी डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी, डॉ.किम्मतकर, डॉ. शिलू गंटावार आदी उपस्थित होते.