Published On : Fri, Apr 20th, 2018

दिलखुलास कार्यक्रमात वसुंधरा दिनानिमित्त उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. 22 एप्रिल या वसुंधरा दिनानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. 21 आणि सोमवार दि. 23 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शासनाचा सन 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प, सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन, रोपांचे संगोपन, वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग, हरितसेना, रॅली फॉर रिव्हर, बांबू लागवड, कांदळवन, वनोपजांच्या विक्रीसाठी वनधन केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, नैसर्गिक पर्यटन स्थळांचा विकास तसेच पर्यावरण स्नेही विकास संकल्पना आदी विषयांची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.