Published On : Mon, May 7th, 2018

‘जय महाराष्ट्र’ मध्ये उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘13 कोटी वृक्ष लागवड’ या विषयावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवार दि. 8 मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील वनाच्छादनाची सध्याची स्थिती, पर्यावरणस्नेही विकास संकल्पना, सन 2017 ते 2019 दरम्यान करण्यात आलेल्या 50 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन, 1926 क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन आदी विषयांची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.