नागपूर: गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने फसवणूक करणाऱ्यांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव लालू उर्फ चुंगल रूप बाबा किशनलाल राठोड असे आहे. तो मध्य प्रदेशातील उज्जैनचा रहिवासी आहे. पण सध्या तो नागपूरच्या कामठी परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या साथीदारांसह नागपूरच्या विविध भागात फसवणूक केली. ही टोळी लोकांना नोटांचे गठ्ठे दाखवून फसवत असे आणि नंतर त्यांचे दागिने घेऊन पळून जायचे.
या टोळीने बहुतेक महिलांना लक्ष्य केले होते. एका प्रकरणात, सक्करदरा पोलीस स्टेशन परिसरात आरोपीने एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे कानातले हिसकावून घेतले होते.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे काही सीसीटीव्ही फुटेज सापडले, ज्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी गेल्या वर्षभरापासून नागपुरात अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी सहा फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणेल आहे. यादरम्यान चौकशीतून सुमारे ३.५ लाख रुपयांचा माल जप्त केला. पोलीस आता आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
ही टोळी लोकांच्या विश्वासाचा फायदा घेऊन सतत फसवणूक करत होती आणि आता पोलिसांना त्यांचा संपूर्ण कट उघडकीस आणण्यात यश आले आहे.