नागपूर : एकेकाळी “ग्रीन सिटी” म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
२०१४ पासून शहरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत, ज्यामुळे नागपूरची हिरवळ नष्ट झाली आहे.हे सर्व भ्रष्ट प्रशासनामुळे घडले असून ता या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी जनता आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
यासोबतच त्यांनी सांगितले की, काँग्रेसला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल. ते दिल्लीला गेले आहेत आणि त्यांनी हायकमांडला लवकरात लवकर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून पक्षाचे संघटनात्मक काम जलदगतीने करता येईल.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याठिकाणी काँग्रेस पक्ष आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पटोले म्हणाले.