Published On : Thu, Jun 21st, 2018

आंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका विशेष योग सत्रामध्ये भाग घेतला आणि प्राणायाम व आसने केली. कैवल्यधाम व योग संस्था सांताक्रुझ यांनी संयुक्तपणे या योगसत्राचे आयोजन केले होते.

राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी योगसत्रामध्ये सहभागी झाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement