Published On : Fri, Apr 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; मार्च-एप्रिलचे पैसे एकत्र येण्याची शक्यता!

Advertisement

नागपूर -राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एप्रिल महिना संपत आला तरीही रक्कम खात्यात जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मागील काही महिन्यांपासून हप्त्यांमध्ये सातत्याने विलंब होत असून, यावेळीही तोच ट्रेंड दिसत आहे. मात्र, आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा झाला होता, त्यामुळे यावेळीही महिनाअखेरीस रक्कम येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिना संपण्यास अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने पुढील काही दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून ती पूर्ण करण्यासाठी फक्त सात दिवसांचा कालावधी उरला आहे. ज्या महिलांची केवायसी अपूर्ण किंवा चुकीची आहे, त्यांनी तातडीने ती दुरुस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो.

Advertisement

योजनेच्या हप्त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, सर्वांचे लक्ष आता पुढील आठवड्याकडे लागले आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges