नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दहेगाव-पिपळा मार्गावर गजानन हॉलसमोर उशिरा रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात इसापूर येथील आशिष डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघे युवक एका दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत होते. त्याचदरम्यान समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला.
अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून फरार कार चालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





