
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ११ ऑक्टोंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५३ मंदीरे, ७ मस्जिद, २७ शाळा व कॉलेज आणि अन्य ४ धार्मिक स्थळांची पाहणी करुन १३६ स्थळांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Advertisement











