Published On : Tue, Dec 18th, 2018

स्मार्ट प्रशासनासाठी नावीन्यपूर्ण वाटचाल

मनपा कर्मचा-यांना प्रशिक्षणाचा स्तुत्य उपक्रम

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना काम करताना येणा-या अडचणी अनेक शासनाचे नियम परिपत्र याबाबतच्या शंकांचे निरसरण करून स्मार्ट प्रशासन निर्माण करण्यासाठी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था (वनामती)ने मनपाला सहकार्य देत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांना स्मार्ट प्रशासनासाठी प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा, वनामतीचे तज्ज्ञ प्रशिक्षक संदीप खोडवे, शिक्षणाधिकारी तथा वनामतीचे प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे, तज्ज्ञ प्रशिक्षक प्रभुजी थुटे उपस्थित होते.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांना कार्यालयीन कार्यपद्घती, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, चौकशी, वित्तीय व्यवस्थापन, पेन्शन, रजा नियम, वेतन निश्चीती व विभागाच्या इतर अडचणींबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये वनामतीचे तज्ज्ञ प्रशिक्षक संदीप खोडवे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून कर्मचा-यांच्या शंकांचे निरसरण केले.

Advertisement

संदीप खोडवे यांनी सेवाज्येष्ठतेनुसार बढती, माहितीचा अधिकार, महिलांचे नोकरीतील आरक्षण व पदभरतीतील आरक्षणाबाबत संभ्रम, निलंबन, सुट्ट्यांचे नियम, अनुकंपा तत्वावर नोकरी, समायोजन, स्वेच्छा निवृत्ती, विनावेतन व अर्धवेतनी रजा याबाबत कर्मचा-यांमध्ये असलेल्या संभ्रमावर विस्तृत चर्चा केली. कर्मचा-यांनीही आपल्या दैनंदीन कामामध्ये येणा-या अडचणी मांडून स्मार्ट प्रशासनासाठी अडसर ठरणारे संभ्रम दूर करून घेतले. शिक्षणाधिकारी तथा वनामतीचे प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे, तज्ज्ञ प्रशिक्षक प्रभुजी थुटे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन करून कर्मचा-यांचे समाधान केले.

प्रशिक्षणामध्ये सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना विभाग, अभिलेख विभाग, विभागीय चौकशी, निवडणूक विभाग, समिती विभाग, नागरी सुविधा केंद्र, जनसंपर्क विभागातील कर्मचा-यांसह सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांनीही प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षणामध्ये सहभागी कर्मचारी, तज्ज्ञ आदींचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी आभार मानले.

१८ डिसेंबर ते ४ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये मंगळवार ते शुक्रवार दररोज दुपारी ४.३० ते ५.३० दरम्यान मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ येथे विविध विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement