Published On : Mon, Feb 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कामगारांवर अन्याय; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक,भांडेवाडी प्लांटमध्ये घुसून कंपनीला अल्टिमेटम!

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरातील कन्स्ट्रक्शन व डिमॉलिश मटेरियल (C&D) संकलन व प्रक्रिया करण्याचे काम राम नाईकी नामक खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून जमा होणारा C&D कचरा भांडेवाडी येथील जागेत प्रक्रिया करून ४० मिमी, २० मिमी, १० मिमी गिट्टी, रेती व माती स्वरूपात बायप्रॉडक्ट तयार केला जातो. या कामासाठी महानगरपालिका कंपनीला प्रतिटन ४५० रुपये अदा करते.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सलग काम करणाऱ्या ९ भूमिपुत्र कामगारांना मागील १५ दिवसांपासून कामावरून काढून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवत “आम्ही महाराष्ट्राचा कायदा मानत नाही. ८ हजार रुपयांत १२ तास काम करायचे असेल तर करा, अन्यथा नाही,” असा वादग्रस्त पवित्रा घेतल्याचे सांगितले जाते.

Gold Rate
02 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,200/-
Gold 22 KT ₹ 1,40,600 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नितीन तिवारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी थेट भांडेवाडी येथील प्लांटमध्ये प्रवेश करत कंपनी व्यवस्थापक सगीर अहमद यांना जाब विचारला. महाराष्ट्राचा कायदा न मानण्याच्या वक्तव्यावरून तिवारी यांनी तीव्र संताप व्यक्त करत शिवसेना स्टाइलमध्ये व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले.

यावेळी तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कंपनीच्या कथित गैरप्रकारांची माहिती दिली. तसेच, काढून टाकलेल्या कामगारांना ४८ तासांत पुन्हा कामावर न घेतल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नागपूर महानगरपालिकेत उग्र मोर्चा काढून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला जाईल, असा इशाराही देण्यात आला. गरज पडल्यास कंपनीच्या कारभाराची पोलखोल करून प्लांटच्या गेटला टाळे ठोकले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाच्या वेळी प्रीतम कापसे, मुन्ना तिवारी, आशीष हाडगे, अब्बास अली, कार्तिक करोसिया, अभिषेक माहुरे, ललित बावनकर, मुकेश सूर्यवंशी, सचिन भगत, सोनू शेख यांच्यासह संबंधित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement