Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जखमी हरिणाला मिळाले जीवदान; सर्पमित्र आकाश मेश्राम यांची तत्परता, वनविभागाच्या मदतीने उपचारासाठी दाखल

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील वडधामना गावात मंगळवारी दुपारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका हरिणाचे प्राण स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सर्प व वन्यजीव मित्र आकाश मेश्राम यांच्या तत्परतेमुळे वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास वडधामना गाव परिसरात काही भटकी कुत्री एका हरिणाचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणाची अवस्था पाहून नागरिकांनी तातडीने सर्पमित्र आकाश मेश्राम यांना संपर्क साधला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहिती मिळताच आकाश मेश्राम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत जखमी हरिणाची सुटका केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मदत मागविण्यात आली. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जखमी हरिणाला तातडीने उपचारासाठी टीटीसी (Transit Treatment Centre) येथे दाखल करण्यात आले.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत असून ग्रामीण भागात अशा घटना वारंवार घडत आहेत. वेळेत मदत मिळाल्यामुळे या हरिणाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढली आहे.

Advertisement

स्थानिक नागरिकांनी आकाश मेश्राम यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. वन्यजीव संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मेश्राम यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

“नागरिकांची जागरूकता आणि वेळेवर दिलेली माहिती यामुळेच हरिणाला जीवदान मिळाले. वन्यजीव दिसल्यास किंवा ते संकटात असल्याचे आढळल्यास तातडीने वनविभाग किंवा अधिकृत बचाव पथकाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आकाश मेश्राम यांनी केले.

या घटनेमुळे वन्यजीव संवर्धनासाठी नागरिक आणि बचावकर्त्यांमधील समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

रविकांत कांबळे | नागपूर टुडे (Exclusive)

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.