Published On : Tue, Nov 16th, 2021

कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. प्रहार जनशक्ती पक्षाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Advertisement

काही दिवसांपासून सिने अभिनेत्री कंगना राणावत यांनी अनेक प्रक्षोभक वक्तव्य करून देशातील सौहदर्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच दिलेल्या वक्तव्यानुसार आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य युद्धात आहुती दिलेल्या व आपले सर्वस्व देशावर अर्पन केलेल्या शाहिदांचा व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून व कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहरातर्फे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर तर्फे शबिना शेख यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर अध्यक्ष राजेश बोढारे आणि उपाध्यक्ष ऋषी कुवर, उत्तर नागपूर संपर्क प्रमुख अरमान खान व मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या वक्तव्यात शबिना शेख यांनी सांगितले की, कंगणाचे हे वक्तव्य देशविरोधी आहे. या वक्तव्याने समस्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान झालेला आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळावा म्हणून राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, खान अब्दुल गफार खान,चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अशफाक उल्ला खान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या लाखो देशभक्तांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला. अनेक देशभक्तांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळाले. कंगना सारख्या एका महिलेने हे वक्तव्य करणे हे लाजिरवाणे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा हा अपमान असल्यामुळे कंगना राणावत यांचेवर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना भारत सरकारतर्फे दिलेले सर्व पुरस्कार परत घेण्यात यावी असे राजेश बोढारे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जर कंगणाचे सर्व पुरस्कार परत घेऊन राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे मार्गार्शनात आक्रमक आंदोलन उभारण्यात येईल.